एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टवेराचा अपघात, पाच प्रवाशांचा मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. भातण बोगद्याजवळ टवेरा जीपच्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त टवेरा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. चिपळूणहून मुंबईकडे परत येत असताना टवेरा जीपच्या चालकाचा ताबा सुटला आणि जीपनं कंटेनरला जोरदार धडक दिली. यात गाडीतील 8 प्रवाशांपैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगाराम रावण, संदीप रावण, संजय रावण, जयराम आंबेकर आणि मिलिंद पवार अशी मृतांची नावं आहेत. मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे मुंबईतील शिवडी आणि ऐरोलीचे रहिवासी होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























