(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा फंडा, मुंबईतल्या युवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर भाजपने (BJP) कंबर कसली आहे. आता भाजप युवकांना साद घालणार आहे. राज्यात आधीच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावतीने युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असताना आता मुंबईतील युवकांना भाजप साद घालणार आहे. यासाठी येत्या 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने घेतलेले निर्णय, योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम ही समिती करणार आहे या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअर बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याचमुळे आता मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान असणार असून, महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवले जाणार आहे.
नवीन मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न
येत्या निवडणुकीत भाजप नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना आणि भाजप युती तुटली असून हे दोन पक्ष मुंबईसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मुंबई महापालिका ही शिवसेनेचा श्वास असून तो कसाही करुन रोखायचा यासाठी भाजपने यंदा जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे
मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा मेगाप्लान
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, भाजपच्या मुंबई महापालिका मिशनचाही श्रीगणेशा झाला. यावेळी अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच संबोधितही केलं. अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगाप्लानची माहिती समोर आली आहे. यामध्ये 80-30-40 चा फॉर्म्युला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारे भाजपनं मुंबई पालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
हे ही वाचा :