Mumbai NCB ची नांदेडमध्ये छापेमारी, 100 किलो अंमली पदार्थ जप्त, तीन जणांना अटक
Mumbai NCB : मुंबई एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात छापेमारी केली. यामध्ये 100 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Mumbai NCB : मुंबई एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात छापेमारी केली. यामध्ये 100 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एनसीबी पथकाने तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. छापेमारी अद्याप सुरु असल्याची माहिती मुंबई एनसीबीने दिली आहे. नांदेडमध्ये अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या का फॅक्टरीचा एनसीबीने सोमवारी भांडाफोड केलाय. सोमवारी एनसीबीने नांदेड, जालना आणि औरंगाबाद शहरात छापेमारी केली. एनसीबीची कारवाई अद्याप सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या मुंबई येथील पथकाने सोमवारी नांदेड शहरात एका व्यापारी संकुलावर धाड मारली. या व्यापारी संकुलातल्या एका जागेतून जवळपास एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरू होती. जवळपास पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी एनसीबीच्या एका पथकाने मांजरम येथे जवळपास आठ कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. एनसीबीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी ही मारल्या होत्या. विशाखापट्टणम येथून आलेला हा गांजा जवळ गावाकडे जात असल्याची माहिती होती. त्यातच सोमवारी माळ टेकडी परिसरात शंकरराव चव्हाण चौकात चौकात असलेल्या एका व्यापारी संकुलात धाड मारली या वेळी जवळपास एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. बाजारात 7 ते 12 हजार रुपये किलो या दराने अफू विक्री होते. काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काहीजण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारावर अफू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
A drugs factory busted in Nanded district of Maharashtra during a raid. A total of 100 kgs of drugs seized so far in the raids that began yesterday in Nanded, Jalna, and Aurangabad districts. Three people have been detained so far. Raids are still underway: Mumbai NCB
— ANI (@ANI) November 23, 2021
नांदेड शहरात समीर वानखेडे यांच्या मुंबई NCB पथकाकडून धाड सत्र
नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात डोडा भुकटी पावडर मुंबई NCB च्या पथकाने हस्तगत केल्याचीही माहिती मिळाली आहे. डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करत व मुद्देमाल जप्त करत NCB ने ह्या कारखान्यास सील ठोकले आहे. याठिकाणी मुंबई NCB पथकाला रस्त्या लगत असणाऱ्या एका हॉटेल पाठीमागे हा डोडा कारखाना चालत होता. या कारखान्यातून NCB मुंबई च्या या पथकास मोठ्या प्रमाणात पोत्यामध्ये भरलेला डोडा व भुकटी अंमली पदार्थ ताब्यात घेऊन सील करण्यात आलाय. NCB मुंबई च्या चार अधिकारी असणाऱ्या या पथकाने समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वात या अगोदर नायगाव येथील मांजरम येथे मोठ्या प्रमाणात गांजा कार्यवाही केली होती. आज याच पथकाने नांदेडात कार्यवाही करत तीन जणांना ताब्यात घेत,डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखाना सील केलाय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha