एक्स्प्लोर
मुंबई म्हाडाच्या सोडतीला सुरुवात, भाग्यवान विजेत्यांचा आनंदोत्सव
तब्बल एक लाख 64 हजार अर्ज यासाठी आले होते. प्रत्येक प्रवर्गात मोठी स्पर्धा असल्यामुळे अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायनच्या प्रतिक्षानगर भागातील घरांची पहिल्यांदा सोडत काढण्यात आली. अनिता तांबे या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीच्या पहिल्या विजेत्या ठरल्या. दरम्यान, लवकरच कोकण विभागाचीही म्हाडाची लॉटरी काढली जाईल.
मुंबई : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील एक हजार 384 सदनिकांची संगणकीय सोडत झाली आहे. एक हजार 384 लोकांचं मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न आज म्हाडानं पूर्ण केलं आहे. मुंबई विभागातल्या 1 हजार 384 घरांची आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात सोडत झाली. घर मिळालेल्या भाग्यवान विजेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
तब्बल एक लाख 64 हजार अर्ज यासाठी आले होते. प्रत्येक प्रवर्गात मोठी स्पर्धा असल्यामुळे अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायनच्या प्रतिक्षानगर भागातील घरांची पहिल्यांदा सोडत काढण्यात आली. अनिता तांबे या म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीच्या पहिल्या विजेत्या ठरल्या.
म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे.
म्हाडाच्या लॉटरीत हे राजकारणी ठरले भाग्यवान!
- शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के यांना पाच कोटी 80 लाख आणि चार कोटी 99 लाख किमतीचे कंबाला हिल ग्रांट रोड इथल्या धवलगिरी या इमारती मध्ये दोन फ्लॅट लागले आहे.
- खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परेल येथील 99 लाखाचे घर लागले आहे.
- शिवसेनेचे नगरसेवक रामदास कांबळे यांना सायन प्रतिक्षा नगर येथील तुंगा पवईत उच्च उत्पन्न गटात 99 लाखांचे घर लागले आहे.
- भाजपचे माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शहा हे कांदिवली महावीर नगर मध्ये प्रतीक्षा यादीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement