एक्स्प्लोर
मुंबईमध्ये बिल्डरची गोळ्या झाडून आत्महत्या
आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. चेंबूरमधील सिंधी कॉलनीतील कार्यालयात साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
![मुंबईमध्ये बिल्डरची गोळ्या झाडून आत्महत्या Mumbai : Builder Sanjay Agarwal commits suicide मुंबईमध्ये बिल्डरची गोळ्या झाडून आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/03172906/suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत एका बिल्डरने आपल्या कार्यालयात गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. संजय अग्रवाल असं बिल्डरचं नाव आहे. ते संजोना बिल्डर्सचे पार्टनर आहेत. या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. चेंबूरच्या सिंधी कॉलनीतील संजोना कॉम्प्लेक्समधील कार्यालयात सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
संजोना बिल्डर्सचे पार्टनर संजय अग्रवाल यांनी स्वत:वर गोळी झाडली त्यावेळी त्यांचा मुलगा आणि मेव्हणा त्यांच्या केबिनबाहेर होते. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची तक्रार दाखल केली आहे. राजावाडी रुग्णालयात संजय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
चेंबूरच्या दहाव्या रोडवर त्यांच्या प्रकल्पाचं काम सुरु होतं. या प्रकल्पाला विलंब होत असल्याने ते तणावाखाली होते असे कुटुंबियांनी सांगितले. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाहीये.
मुंबईमध्ये यापूर्वीही बिल्डरांच्या आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक एमसीएचआयचे (महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज) अध्यक्ष सूरज परमार (49) यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. तर कल्याणमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एमसीएचआयचे सदस्य आसिफ झोजवाला यांनी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)