एक्स्प्लोर
मराठा मोर्चा परिणाम, एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान
आंदोलनात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एसटीला टार्गेट केले. यात एसटीच्या 183 बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच विविध मार्गावरच्या फेऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधीचं उत्पन्न बुडाले.
धुळे : आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं गेल्या सहा दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा एसटीचं इतिहासातील आजवरचं सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या सहा दिवसात झालेल्या आंदोलनमुळे एसटीचा 35 कोटी पेक्षा अधिकचा महसूल बुडाला आहे. एका दिवसात साडे पंधरा कोटींचं नुकसान एसटी महामंडळाला झाले आहे.
आंदोलनात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एसटीला टार्गेट केले. यात एसटीच्या 183 बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच विविध मार्गावरच्या फेऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधीचं उत्पन्न बुडाले. हिंसक आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झाल्यानं 15 कोटीच्या महसुलावर एसटी महामंडळाला पाणी सोडावं लागलं. हा महसूल फक्त 25 जुलै या एका दिवसाचा आहे. गेल्या सहा दिवसात एसटीचे सुमारे 35 कोटी पेक्षा अधिकच नुकसान झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एसटीला मिळणारा रोजचा महसूल, तसेच आंदोलकांनी एसटीवर केलेली दगडफेक, एसटीची जाळपोळ या बाबींचा नुकसानात समावेश आहे. जोपर्यंत नुकसान झालेल्या बसेस दुरुस्त होऊन मार्गावर धावत नाही तोपर्यंत एसटीचं हे देखील अप्रत्यक्ष नुकसानच असणार आहे. कारण एक एसटी महामंडळाला दर दिवसाला किमान दहा हजाराचा महसूल देते .
दरम्यान, मागील काळात एसटीला झालेला तोटा भरून काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे तर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांना या नुकसानीमुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement