एक्स्प्लोर

MPSC च्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट कधीपर्यंत? 31 जुलैपर्यंत पदं भरण्याच्या आश्वासनाचं काय झालं? 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीतली पदं भरण्याचं आश्वासन विधानभवनात दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न विद्यार्थ्यांतून विचारला जात आहे. 

मुंबई : राज्य सरकारने 31 जुलैपर्यत एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वास दिलं होतं. मात्र सरकार अजून याबाबत  गांभीर नाही असंच दिसतंय. गेली अनेक वर्ष नुसतं आम्ही परीक्षा देत आहोत. त्यासाठी वेळ काढूपणा केला जात आहे. त्यामुळे दिलेली आश्वासन तरी सरकारने पूर्ण करावी अशी मागणी एमपीएससी करणारे विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीतली पदं भरण्याचं आश्वासन विधानभवनात दिलं होतं. अजित पवारांच्या या विधानसभेत दिलेल्या आश्वासनानंतर एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक आशेची पालवी निर्माण झाली होती. पण अजित पवार यांनी दिलेला विधानसभेतील आश्वासनही पूर्ण झालं नाही आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हाल 'जैसे थे' आहेत.

आजच्या घडीला विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाला एमपीएससी आणि सरकार यांच्यातील नसलेला समन्वय जबाबदार आहे. एमपीएससीच्या या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे स्वप्नील नावाच्या एका परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एमपीएससी परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे बेहाल याला एकूणच प्रशासन, सरकार आणि एमपीएससी यांचे सामूहिक अपयश जबाबदार आहे. 

सामान्य प्रशासन विभागाकडून प्रत्येक वर्षी विविध विभागाकडून मनुष्यबळाची गरज पाहून मागणी केली जाते. त्याला एकत्रितरीत्या एमपीएससी कडे पाठवणे आवश्यक असते. मात्र तसं होत नाही. त्यात त्रुटी आणि दिरंगाई होते. एमपीएससीचे सदस्य आणि मनुष्यबळाची पूर्तता ही योग्य वेळी होत नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून एमपीएससीत सदस्य भरण्याची भूमिका न घेणे यामुळेदेखील विद्यार्थ्यांचे हाल.

विद्यार्थ्यांच्या या अवस्थेला एमपीएससी देखील जबाबदार आहे. वेळेवर परीक्षा न घेणे,  एकच एमपीएससी सदस्य नियुक्त असल्यामुळे विविध परीक्षांच्या वेळेवर मुलाखती न होणे, यूपीएससीच्या धर्तीवर अनुकरण आणि आधुनिकीकरण न करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नवीन पद्धतीचा अवलंब न करणे या गोष्टी कारणीभूत आहेत. एमपीएससी संविधानात्मक संस्था असून देखील राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराची शिकार होते .

यूपीएससीला जे जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? वेगवेगळ्या डिफेन्सच्या परीक्षा होतात, त्या यंत्रणेला जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे?  विधानसभेत सांगून सुद्धा जर वचनाची पूर्तता होत नसेल तर त्या नेत्यांवर हक्कभंग नका आणू नये? हे सगळे प्रश्न आता रात्रीचा दिवस करुन एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे मुलं विचारत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

CBSE 10th Result 2021 : CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
Coronavirus Cases : सहा दिवसानंतर देशातील रुग्णसंख्या घटली; गेल्या 24 तासात 30 हजार नव्या रुग्णांची भर, 442 जणांचा मृत्यू
India vs Belgium, Hockey Semi-Final : फायनल्स गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं; बेल्जियमचा 5-2 नं विजय

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget