Shahu Maharaj on Shivaji Maharaj Statue : पुतळ्याच्या घटनेनं महाराष्ट्र, भारतच नव्हे, तर देशाबाहेरील लोक देखील संतप्त; जे घडलं त्याला मोकळं सोडलं जाणार नाही; शाहू महाराज कडाडले
महाराजांचा मान चांगल्या पद्धतीनेच ठेवला पाहिजे. त्या पद्धतीनेच पावलं उचलली गेली पाहिजेत. ज्यानी पुतळ्याचा कार्यक्रम करून घेतला, त्यांचा निषेध केला पाहिजे असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.
Shahu Maharaj on Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सर्वांनीच ठेवला पाहिजे, ज्यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली. महाविकास आघाडीने आज (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर पायी विराट मोर्चा काढत जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनाला परवानगी नसतानाही महाविकास आघाडीने पर्वा न करता जोरदार आंदोलन केले. पायी मोर्चाचे रुपांतर गेटवे ऑफ इंडिया समोर जाहीर सभेत झाले. जाहीर सभेमध्ये बोलताना शाहू महाराज यांनी झालेल्या घटनेवर सडकून टीका केली.
महाराष्ट्र, भारत नव्हे तर भारताबाहेर देखील लोक संतप्त
शाहू महाराज (Shahu Maharaj on Shivaji Maharaj Statue) म्हणाले की, मालवणमध्ये जे काही झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र, भारत नव्हे तर भारताबाहेर देखील लोक संतप्त झाले आहेत. अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा बसवणे हा महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे जे घडलं आहे त्याला मोकळं सोडलं जाणार नाही. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप असल्याने दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शाहू महाराजांनी यावेळी केली. महाराजांचा मान चांगल्या पद्धतीनेच ठेवला पाहिजे. त्या पद्धतीनेच पावलं उचलली गेली पाहिजेत. ज्यानी पुतळ्याचा कार्यक्रम करून घेतला, त्यांचा निषेध केला पाहिजे असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.
हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि याला कधीच माफी नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, ते म्हणतात आम्ही राजकारण करतोय, तर तुम्ही गजकर्ण करत आहात. या चुकीला माफी नाही. देशाच्या प्रवेश द्वारावर आम्ही सांगत आहोत. माफी नसती मागितली, तर शिल्लक ठेवलं नसतं महाराष्ट्रने असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मग्रुरीने माफी मागितली, त्यात हाल्फ आणि फुल हसत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. माफी का मागितली सांगा? अशी विचारणा त्यांनी केली. नौदल दिवशी घाईने काही करायची गरज नाही. माफी कशाकशाची मागणार? राम मंदिर, महाराजांचा पुतळा अनेक घटना घडल्या त्यासाठी का? अशीही विचारणा त्यांनी केली. हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि याला कधीच माफी नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या