(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#मराठीतशपथ : महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, नेटीझन्सची सोशल मीडियावर मागणी
महाराष्ट्रातून निवडून आलेल्या जवळपास सर्वच खासदारांना उत्तम मराठी येते. म्हणून सर्व खासदारांनी मराठीत खासदारकीची शपथ घ्यावी. खासदार पुढे येऊन ट्विटरवरील या मागणीला पाठिंबा देतात, हे पाहावं लागेल. सोशल मीडियातील मराठी तरुणांनी ही मोहीम सुरु केल्यापासून एकाही खासदाराने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे. अनेकांनी या मोहिमेला समर्थन देत ट्वीट केलं आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असा यामागे उद्देश आहे.
मराठी भाषा प्राचीन भारतीय भाषा आहे. तसेच मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटर केला जात आहे.
महाराष्ट्रातून निवडून आलेल्या जवळपास सर्वच खासदारांना उत्तम मराठी येते. म्हणून सर्व खासदारांनी मराठीत खासदारकीची शपथ घ्यावी. तसेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नेटीझन्सकडून होत आहे.
मराठी भाषेबाबतच्या आणि खासदारांनी मराठी शपथ घेण्याच्या आशयाचे अनेक ट्वीट ट्विटरवर अनेकांकडून केले जात आहेत. अनेकांनी तर नव्या खासदारांना टॅग करत ही मागणी केली आहे. मात्र अद्याप एकाही खासदाराने नेटीझन्सच्या ट्विटला रिप्लाय दिलेला नाही.
शिवसेनेची मराठी माणसाबद्दलची आणि मराठी भाषेबद्दलची भूमिका अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार पुढे येऊन ट्विटरवरील या मोहिमेला पाठिंबा देतात का? हे पाहावं लागेल.
महाराष्ट्रातून निवडून आलेल खासदार
नंदुरबार हिना गावित (भाजप) धुळे सुभाष भामरे (भाजप) जळगाव उन्मेष पाटील (भाजप) रावेर रक्षा खडसे (भाजप)) बुलडाणा प्रतापराव जाधव (शिवसेना) अकोला संजय धोत्रे (भाजप) अमरावती नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी) वर्धा रामदास तडस (भाजप) रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना) नागपूर नितीन गडकरी (भाजप) भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप) गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप) चंद्रपूर बाळू धानोरकर (काँग्रेस) यवतमाळ - वाशिम भावना गवळी (शिवसेना) हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना) नांदेड प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) परभणी संजय जाधव (शिवसेना) जालना रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद इम्तियाज जलिल (वंचित बहुजन आघाडी) दिंडोरी डॉ. भारती पवार (भाजप) नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना) पालघर राजेंद्र गावित (शिवसेना) भिवंडी कपिल पाटील (भाजप) कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) ठाणे राजन विचारे (शिवसेना) मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) मुंबई - उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर (शिवसेना) मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मनोज कोटक (भाजप) मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना) दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) रायगड सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) पुणे गिरीश बापट (भाजप) बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) शिरुर अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) अहमदनगर सुजय विखे (भाजप) शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना) बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना) लातूर सुधाकरराव श्रंगारे (भाजप) सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) सांगली संजयकाका पाटील (भाजप) सातारा उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना) कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना) हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना)