एक्स्प्लोर

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर खासदार दिलीप गांधी म्हणतात...

मुंबईमध्ये सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी देखील सुजयच पक्षात स्वागत केलं आहे. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती

अहमदनगर : मुंबईमध्ये सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी देखील सुजयच पक्षात स्वागत केलं आहे. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. VIDEO | सुजय विखे पाटीलांच्या भाजप प्रवेशावर खासदार दिलीप गांधींची प्रतिक्रिया | एबीपी माझा यावेळी गांधी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टी आणि जनसंघापासून कार्यकर्ता आहे आणि उद्या देखील कार्यकर्ता राहणार आहे. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो मान्य असल्याचं सांगत पुढची भूमिका योग्य वेळी देणार असल्याचं दिलीप गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात गांधी समर्थकांनी घोषणाबाजी केल्याचं देखील मान्य करत त्याचं समर्थन केलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी "सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा! अशा घोषणांना संपूर्ण हॉल दणाणून गेला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हेलियनच्या गरवारे बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात, जोरदार शक्तप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला. वडिलांच्या इच्छेविरोधात निर्णय : सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर खासदार दिलीप गांधी म्हणतात... पक्षप्रवेश झाल्यानंतर सुरुवातीला सुजय विखे पाटील यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन निर्णय घेतला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली, मी त्यांच्यासोबत आहे, असं सुजय यांनी यावेळी सांगितलं. तसंच अहमदनगर जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्याचं काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. VIDEO | नगरच्या विखेंची नवी पिढी आता भाजपसोबत | मुंबई | एबीपी माझा सुजय विखे अहमदनगरमधील भाजपचे उमेदवार : मुख्यमंत्री सुजय विखे पाटील यांच्या रुपाने उमदं नेतृत्त्व भाजपमध्ये आलं आहे. आता अहमदनगर हा भाजपचा बालेकिल्ला होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रवेशानंतर दिली. तसंच लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील भाजपचे उमेदवार असतील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र आपल्याला दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच बंड करुन सुजय विखेंनी निर्णय घेतला आहे. आज नाहीतर उद्या सुजय यांचाच निर्णय योग्य असल्याचं घरच्यांच्या लक्षात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. अहमदनगरच्या जागेवरुन नाराजी सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सकाळपासूनच प्रवेशाची लगबग प्रवेशासाठी आज सकाळीच सुजय विखे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डीलेही शिवनेरी बंगल्यावर उपस्थित होते. शिवाय अहमदनगरमधील सर्व स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सुजय यांच्या स्वागतासाठी सज्ज रहा, असा निरोप पक्षश्रेष्ठीने दिला होता. सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. दिलीप गांधी समर्थकांचा विरोध मात्र अहमदनगर लोकसभेचं तिकीट सुजय विखेंना दिल्यास विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे दिलीप गांधी समर्थकांनी सुजय विखेंच्या नावाला विरोध केला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करत घोषणाबाजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालं होतं. अहमदनगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. शरद पवार सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय? असा सवाल उपस्थित केला होता. शिवाय जागेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र शेवटपर्यंत जागेचा तिढा न सुटल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विखे पाटील यांची नाराजी सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चावरुन राधाकृष्ण पाटील यांना हायकमांडचं बोलावणं आलं होत. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या जागावाटपासंबंधी तोडगा निघाला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली. अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता. संबंधित बातम्या

सुजय विखेंच्या प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी, मुख्यमंत्री नाराज

सुजय विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा

सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल, शरद पवारांकडून 50 वर्ष जुन्या पवार-विखे संघर्षाची आठवण

आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : नागपूर खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी! औरंगाबाद खंडपीठालाही धमकीचा ई-मेल, ‘मद्रास टायगर’चं कनेक्शन? पोलिसांकडून तपास
नागपूर खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी! औरंगाबाद खंडपीठालाही धमकीचा ई-मेल, ‘मद्रास टायगर’चं कनेक्शन? पोलिसांकडून तपास
मंत्रिमंडळ बैठकीत गेमचेंजर निर्णय, राज्यातील मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार: नितेश राणे
मंत्रिमंडळ बैठकीत गेमचेंजर निर्णय, राज्यातील मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार: नितेश राणे
सावत्र लेकीवर अत्याचार,बायकोची हत्या करुन पळाला; 21 वर्ष नाव बदलून राहिला,अखेर धारावीत सापडला!
सावत्र लेकीवर अत्याचार,बायकोची हत्या करुन पळाला; 21 वर्ष नाव बदलून राहिला,अखेर धारावीत सापडला!
Nashik Satpir Dargah : सातपीर दर्गा परिसर पाहणीआधीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; म्हणाले, हिंमत असेल तर...
सातपीर दर्गा परिसर पाहणीआधीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; म्हणाले, हिंमत असेल तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime News|तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गावगुंडांकडून मारहाण, बंदुकीचा धाक दाखवत मारहाणKolhapur Accident Video : टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEOABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 22 April 2025Sharad Pawar Sunetra Pawar :विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठक, शरद पवार - सुनेत्रा पवार एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : नागपूर खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी! औरंगाबाद खंडपीठालाही धमकीचा ई-मेल, ‘मद्रास टायगर’चं कनेक्शन? पोलिसांकडून तपास
नागपूर खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी! औरंगाबाद खंडपीठालाही धमकीचा ई-मेल, ‘मद्रास टायगर’चं कनेक्शन? पोलिसांकडून तपास
मंत्रिमंडळ बैठकीत गेमचेंजर निर्णय, राज्यातील मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार: नितेश राणे
मंत्रिमंडळ बैठकीत गेमचेंजर निर्णय, राज्यातील मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार: नितेश राणे
सावत्र लेकीवर अत्याचार,बायकोची हत्या करुन पळाला; 21 वर्ष नाव बदलून राहिला,अखेर धारावीत सापडला!
सावत्र लेकीवर अत्याचार,बायकोची हत्या करुन पळाला; 21 वर्ष नाव बदलून राहिला,अखेर धारावीत सापडला!
Nashik Satpir Dargah : सातपीर दर्गा परिसर पाहणीआधीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; म्हणाले, हिंमत असेल तर...
सातपीर दर्गा परिसर पाहणीआधीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; म्हणाले, हिंमत असेल तर...
Mumbai Attacks : 26\11 मुंबई हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती
26\11 मुंबई हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती
Rajendra Ghanwat wife Manali Ghanwat: राजेंद्र घनवटांच्या बायकोला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांच्या हातामध्ये.... अंजली दमानियांचा नवा दावा
राजेंद्र घनवटांच्या बायकोला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांच्या हातामध्ये.... अंजली दमानियांचा नवा दावा
Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
UPSC निकालात पुण्याच्या आर्चित डोंगरेने झेंडा फडकवला, महाराष्ट्रात पहिला, देशात तिसरा!
UPSC निकालात पुण्याच्या आर्चित डोंगरेने झेंडा फडकवला, महाराष्ट्रात पहिला, देशात तिसरा!
Embed widget