आजपर्यंत अशी राखीपौर्णिमा पाहिली नाही, बहिणीला दिल्या जाणाऱ्या ओवाळणीला नियम अटी लागू, कोल्हेंचा निशाणा
भाजपवाले (BJP) गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत. रामाचे बोलतात पण कामाचे बोलत नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपवर टीका केली.
Amol Kolhe : भाजपवाले (BJP) गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत. रामाचे बोलतात पण कामाचे बोलत नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पदभरती न करता शिल्लक राहिलेल्या पैशात योजना आणून मत खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 270 कोटी रुपये योजनाच्या जाहिरतीसाठी खर्च केले जातात. 300 कोटी रुपये योजनादूतसाठी खर्च केले जाणार आहेत. म्हणजे 500 कोटी रुपये केवळ योजना पोहोचवण्यासाठी खर्च केले जात असल्याचे कोल्हे म्हणाले. लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन देखील कोल्हेंनी सरकारवर टीका केली.
आमचा योजनेला विरोध नाही तर त्याच्या मागे असलेल्या हेतूला आमचा विरोध असल्याचे कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात आली आहे. यावेळी सोलापुरात खासदार अमोल कोल्हे यांनी भादपवर जोरदार टीका केली. आंबा नासला की आपण आड बदलत नाही तर आंबा बदलतो असेही कोल्हे म्हणाले.
पंतप्रधान सोलापुरात आले पण पंढरपूरला पांडुरंगच्या दर्शनासाठी गेले नाहीत
पंतप्रधान सोलापुरात आले पण पंढरपूरला पांडुरंगच्या दर्शनासाठी गेले का? असा सवाल कोल्हे यांनी केला. जातीभेदाच राजकारण करणाऱ्या पंतप्रधानना चंद्रभागेत अठरा पगड जातींचे वैष्णव दिसतील म्हणून ते गेले नसावेत असंही ते म्हणाले. दरम्यान, गद्दारी करणारा जितका दोषी तितकाच दोषी गद्दारी करायला लावणाराह दोषी असल्याचे कोल्हे म्हणाले. शोलेमध्ये डायलॉग आहे सो जा बेटा वरना गब्बर आयेगा, आता म्हणतात गप बसा अन्यथा ईडी सीबीआय येईल असे कोल्हे म्हणाले. भाजपवाले गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत, रामाचे बोलतात पण कामाचे बोलत नाहीत असेही कोल्हे म्हणाले. पदभरती न करता शिल्लक राहिलेल्या पैशात योजना आणून मत खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे कोल्हे म्हणाले.
बहिणीला दिल्या जाणाऱ्या ओवाळणीला नियम अटी लागू
आणदार रवी राणा बोलले की, मतदान केलं नाही तर पैसे परत घेणार आहोत. राज्याचे अर्धे मुख्यमंत्री म्हणाले की योजना सुरु ठेवायची असेल तर आमचं बटन दाबाव लागेलं असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला. 9 वर्ष ज्या भावाने तुम्हाला पाहिलं नाही आणि दहाव्या वर्षी स्वतःच्या स्वार्थासाठी आला तर तुम्ही काय करणार? आजपार्यंत आम्ही अशी राखीपौर्णिमा पहिली नाही, जिथं बहिणीला दिल्या जाणाऱ्या ओवाळणीला नियम अटी लागू आहेत असंही अमोल कोल्हे म्हणाले.
खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्ती
मराठा बांधवांनी घातलेल्या घेरावावर बोलताना कोल्हे म्हणाले की, ती त्यांची भावना होती. त्यांनी ती बोलून दाखवली. प्रत्येकं भावनेचा आदर केला गेला पाहिजे हे आमचं मत आहे. सत्ताधारी पक्षानं यामध्ये त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं पाहिजे असंही कोल्हे म्हणाले. कांदा निर्यातबंदीच्या वेळी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं होतं. मात्र, कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी हे आंदोलन असल्याचे म्हणत फेक व्हिडीओ पसरवले गेले. त्यामुळेच फेक नेरेटिव्ह कोण पसरवत हे सगळ्यांना माहिती आहे. खोटे बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्ती असल्याचे कोल्हे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
फक्त 'याच' महिलांच्या खात्यात 17 तारखेला येणार 3000 रुपये, लाडकी बहीण योजनेतील Review, Disapproved, Rejected चा नेमका अर्थ काय?