सुशांत प्रकरणी काही लोकांच्या पडद्यामागून हालचाली : संजय राऊत
सुशांतसिह राजपूत आत्महत्याप्रकरणी राजकारण होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असताना बिहार सरकार सीबीआयची मागणी करते, केंद्र सरकार त्याला लगेच मान्यता देते. ज्या घाईघाईने घडामोडी घडवल्या जात आहे त्यामुळे संशय येत आहे. सत्य बाहेर येऊ नये यासाठी पडद्यामागून कोणीतरी हालचाली करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा राजकीय फायद्या तोट्यासाठी काही लोक वापर करत आहे. हे अत्यंत तो घृणास्पद आहे. मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करावा. आणि तपासानंतर यावर टीका करण्यास काही हरकत नाही कारण देशात लोकशाही आहे. परंतु मुंबई पोलिस हे उत्तम आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल केला. सुशांतसिंह प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित करणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते असं राऊत यांनी म्हटलंय. तत्पूर्वी सामनाच्या रोखठोकमधील सदरात राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. सिनेक्षेत्रात दहशत निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा तपास खेचला नाही ना? असं राऊतांनी म्हटलं होतं.
काही चॅनेल्सकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; संजय राऊतांना फोन करुन शरद पवार यांच्याकडून नाराजी