एक्स्प्लोर
मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याविरोधात सर्वाधिक तक्रारी
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याविरोधातच सर्वाधिक तक्रारी आल्या असल्याची माहिती समजते आहे. गेल्या 20 महिन्यात 71 हजार 475 तक्रारी आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या 2 वर्षात 31 खात्यांविरोधात तब्बल 2 लाख 44 हजार 112 तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक तक्रारी या गृह खात्याविरोधात आहेत. गृह खात्याविरोधात तब्बल 71,475 तक्रारी आहेत. तर महसूल आणि वन खात्याविरोधात 24,293 तक्रारी आहेत. तर नगर विकास विरोधात 15,388 तक्ररी करण्यात आल्या आहेत. तर सामान्य प्रशासन आणि ग्राम विकास यांच्याविरोधात अनुक्रमे 9,461 आणि 9368 एवढ्या तक्रारी केल्या गेल्या आहेत.
एकूण 2 लाख 44 हजार 112 तक्रारीत टॉप 5 मध्ये गृह, महसूल, नगर विकास, सामान्य प्रशासन आणि ग्रामीण विकास यांचा क्रमांक येतो.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतील गृह, नगर विकास आणि सामान्य प्रशासन आहे. आणि त्यांच्याच विभागाविरोधात सर्वाधिक तक्रारी आल्यामुळे त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement