एक्स्प्लोर

Morning Headlines 28th July : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मुंबईत होणार्‍या भाजप विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीची तारीख ठरली?

Opposition Meeting In Mumbai: विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत होणारी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे, ज्यामध्ये संयोजकांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून महाआघाडीची स्थापना केली आहे. वाचा सविस्तर

केंद्र सरकारकडून पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट, आता आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकणार

CGHS : केंद्र सरकारच्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. आता पुरुष कर्मचारी देखील केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत त्यांचे आई-वडील आणि सासरच्या लोकांना लाभार्थी बनवू शकतात. यापूर्वी ही सुविधा फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. या नव्या आदेशानंतर महिला आणि पुरुष केंद्रीय कर्मचारी या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मोदी सरकारची ही योजना नेमकी काय आहे आणि केंद्र सरकारचे पुरुष कर्मचारी त्याचा कसा फायदा घेऊ शकतील याविषयी जाणून घेऊयात. वाचा सविस्तर

'तुझा रंग जरा गोरा आहे आणि...' नोकरीत मुलाखतीच्या अंतिम फेरीत मुलीला चक्क रंगावरुन नाकारलं

Job Interview : आजच्या काळात ऑफिसमधलं वर्क कल्चर फारच बदलली आहेत. अलिकडेच एका महिलेने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल सांगितले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. प्रतीक्षा जिचकर असं या महिलेचं नाव असून तिने लिंक्डइनवर नोकरीसाठी मुलाखत देताना आलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'नोकरीची संधी देणाऱ्यांनी मला नोकरी न देण्याचे विचित्र कारण दिले.'तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मुलाखतीच्या अंतिम फेरीत मला नाकारण्यात आलं कारण माझ्या त्वचेचा रंग बाकीच्या टीम मेंबर्सपेक्षा गोरा आहे." वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM किसानच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती

CM Eknath Shinde : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आलं आहे. काल (27 जुलै) राजस्थानमध्ये झालेल्याा कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्या लाभापोटी सुमारे एक हजार 866 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वाचा सविस्तर

जागतिक अर्थव्यवस्थेच्या हरित आणि शाश्वत विकासासाठी दिल्लीत दोन दिवस परिषद, 40 विचारवंतांचा सहभाग

NITI Aayog : नीती आयोगातर्फे जागतिक अर्थव्यवस्थेसाठीच्या हरित आणि शाश्वत विकास कार्यक्रमावर आधारित जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आज (28 जुलै) आणि उद्या (29 जुलै) या दिवसीय परिषद होणार आहे. या कार्यक्रमात सुमारे 40 अग्रणी विचारवंत सहभागी होणार आहेत. यातून उच्च गुणवत्तेच्या शाश्वत विकासाला पाठींबा देण्याबाबत एकमत मिळवण्याची संधी मिळणार असल्याचे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping बालीच्या G20 बैठकीत नेमके काय बोलले? परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

PM Modi-Xi Jinping Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे गेल्या वर्षी 2022 मध्ये बाली येथे अनौपचारिकपणे एकमेकांना भेटले. त्यांच्या भेटीचे निमित्त होते G20 परिषदेचे. या परिषदेतच भारताला 2023 साठी G20 चे अध्यक्षपद देण्यात आले होते. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की या परिषदेत भेटलेल्या दोन नेत्यांमध्ये नेमके काय संभाषण झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी बाली येथे झालेल्या G20 परिषदेत रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकमेकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (28 जुलै) दिली. वाचा सविस्तर

आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 28 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात, तर तूळ राशीच्या लोकांचे जुने वाद संपुष्टात येतील. आजचा शुक्रवार  मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांचा शपथविधी, महाश्वेता देवी यांचे निधन; आज इतिहासात...

28th July In History:  आज जागतिक हिपॅटायटिस दिन आहे. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर, आजच्या दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांचा शपथविधी झाला. आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचे निधनही आजच्या दिवशी झाले. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaSamarjeet Ghatge Mahayuti : समरजीत घाटगे महायुती मेळाव्याला जाणार नाहीत !Rohit Pawar MPSC Protest : MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी  रोहित पवार मैदानातBadlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी सुमोटो अंतर्गत याचिका दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
Embed widget