Horoscope Today 28 July 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 28 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 28 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात, तर तूळ राशीच्या लोकांचे जुने वाद संपुष्टात येतील. आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा जाईल. आज तुमची प्रकृती बर्याच दिवसांपासून थोडीशी बिघडलेली असेल, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात काहीसं तणावाचं वातावरण असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी दिवस थोडा त्रासदायक असेल. जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायात खूप अडचणींना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात कलह वाढू शकतो.
मित्रांचं सहकार्य महत्त्वाचं ठरणार आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचे कोणतेही जुने रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. घरात कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर ही चांगली संधी आहे. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. तसेच, जोडीदाराची साथ तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवीन संधी निर्माण होतील. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चांगला राहील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही भागीदारीद्वारे व्यवसायात कोणतेही काम करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील आणि तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकते. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबात जुना वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. पोटाशी संबंधित कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कोणताही व्यवसाय केलात तर आज तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. व्यवसायात कोणताही मोठा व्यवहार करू नका, अन्यथा त्यात तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करू नका, अन्यथा तुमचा भागीदार तुमची फसवणूक करू शकतो. कुटुंबात काही वाद चालू असतील तर त्या वादापासून दूर राहा, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे वाद खूप वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे वातावरण बिघडू शकते. तुमचा बराचसा पैसा निरुपयोगी कामात खर्च होऊ शकतो, त्यामुळे पैसे जेव्हा खूप आवश्यक असेल तेव्हाच खर्च करा. येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा शुभ मुहूर्त नाही.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर आज व्यवसायात पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. रोजगाराच्या नवीन संधी देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या कुटुंबातील किंवा शेजारच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्या कामात तुम्हाला नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत तुमची स्थिती कायम राहील. लवकरच नवीन नोकरी मिळण्याचे संकेत मिळू शकतात. मित्रांबरोबरचा काळ चांगला जाईल. त्यांचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीवरुन वाद होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक आनंदी दिसतील. आईचा सहवास मिळेल. तुमचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काही काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याचा विचारही कराल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणालाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भरपूर नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यालाही पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता दिसणार नाही. आज ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचेही पूर्ण सहकार्य मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर पालकांना खूप आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे मित्र खूप खूश होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :