CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM किसानच्या 14 व्या हप्त्याचा लाभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती
महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळला आहे. एक हजार 866 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
CM Eknath Shinde : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलं आहे. काल (27 जुलै) राजस्थानमध्ये झालेल्याा कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्या लाभापोटी सुमारे एक हजार 866 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (
CM Eknath Shinde) यांनी दिली.
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजारही शेतकऱ्याला मिळणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे सहा हजार आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार असे वर्षाला एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे वितरण
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. एकूण 18 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तसेच देशातील सव्वा लाख 'पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्राकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत
PM किसान योजनेचा एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला गेला. राजस्थानमधील (Rajasthan) सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत केला. PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. अखेर पुढचा 14 हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरीत करण्यत आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: