एक्स्प्लोर

Morning Headlines 04 July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Updates : देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातसह आसाममध्ये पूरस्थिती

Weather Updates : देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस (Hevay Rain)  सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळं गुजरात आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर 

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार

President Draupadi Murmu on Vidarbha Visit Today : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आजपासून विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी 7 वाजता नागपुरात (Nagpur News) आगमन होणार आहे. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

Odisha Train Accident : ...तर बालासोर ट्रेन अपघात टाळता आला असता, रेल्वे बोर्डाचा धक्कादायक अहवाल समोर

Balasore Train Accident : ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातात शेकडो जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नेमकी चूक कुणाची यावरून अनेक सवाल करण्यात आले होते. आता या अपघातासंबंधित एका अहवालात नवीन धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता, असं रेल्वे बोर्डाकडून अपघाताबाबत अहवाल दिलेल्या अहवालात समोर आलं आहे. अपघाताच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीने अपघातासंदर्भात अहवालात अनेक बाबी उघड केल्या आहेत. वाचा सविस्तर 

Twitter कडून TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च; पण वापर करण्यासाठी ब्लू टिक अनिर्वाय

Twitter Announces New Version of TweetDeck: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच ट्विटरमध्ये (Twitter) अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहेत. आता ट्विटरनं युजर्सच्या ट्वीट पाहण्यावरही निर्बंध लादले आहेत. अशातच ट्विटरनं ऑफिशियली सर्वांसाठी TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटडेक वापरताना युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्या कमी करण्यासाठी ट्वीटडेकचं हे नवं वर्जन मदत करणार आहे. दरम्यान, ट्वीटडेक 30 दिवसांत एक व्हेरिफाइड फिचर होणार आहे. म्हणजेच, जर युजर्सना ट्वीटडेक वापरायचं असेल तर त्यासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घ्यावीच लागेल. वाचा सविस्तर 

Statue of Liberty : आजच्या दिवशी अमेरिकेला मिळालं स्वातंत्र्य, फ्रान्सकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट

Statue of Liberty : अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (Statue of Liberty) जगभरात प्रसिद्ध आहे. जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेला हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक आहे. आजच्या दिवशी म्हणजे 4 जुलै रोजी फ्रान्सने अमेरिकेला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार करण्याचं काम अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी मिळून केलं होतं. या पुतळ्याचा पाया अमेरिकेने बांधला होता, तर पुतळ्याचा वरचा भाग फ्रान्समध्ये तयार करण्यात आला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबाबत रंजक बाबी जाणून घ्या. वाचा सविस्तर 

4th July In History: मराठा आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन, भारताच्या फाळणीचा ब्रिटीश संसदेत ठराव; आज इतिहासात....

4th July In History: आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ब्रिटीश, डच, पोर्तुगीज यांच्यावर समुद्रात वचक ठेवणारे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतीदिन आहे. तर, आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतली. भारताच्या फाळणीचा ठराव ब्रिटीश संसदेत आजच्या दिवशी मांडण्यात आला होता. वाचा सविस्तर 

Horoscope Today : मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य 

Horoscope Today 4 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 4 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget