एक्स्प्लोर

Weather Updates : देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातसह आसाममध्ये पूरस्थिती

Weather Updates : काही राज्यात मुसळधार पाऊस (Hevay Rain)  सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Weather Updates : देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस (Hevay Rain)  सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळं गुजरात आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळं दिल्लीत काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह आसपासच्या भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता 

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार दिल्लीत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्या ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी आठ ते 12 किलोमीटर असू शकतो. दिल्ली हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिल्लीतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे तापमानात फारसा बदल होणार नाही.

गुजरात आणि आसाममध्ये काही भागात जनजीवन विस्कळीत

गुजरात आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात वाढ होत होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, यंदा मान्सून छत्तीसगडमध्ये उशिरा दाखल झाला आहे. हिमाचल प्रदेशातही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं गेल्या आठवड्यात दरड कोसळण्यच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं सध्या पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. 

महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस

राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget