एक्स्प्लोर

Horoscope Today : मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य 

Horoscope Today : आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Horoscope Today 4 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 4 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. 
मेष, कर्क, वृषभ आणि कन्या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला मित्राकडून चांगली बातमी मिळेल. तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधीही मिळतील, त्यातून तुम्हाला नफा मिळवण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. जर तुमचे कोणतेही काम पैशांमुळे थांबले असेल तर तेही पूर्ण होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. पैसे कसे वाचवायचे ते शिकाल जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही खूप आनंदी दिसाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वाढदिवसानिमित्त घरात पूजा-पाठाचेही आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सर्व नातेवाईक येतील. मुलाच्या लग्नाच्या संदर्भात चर्चा होऊ शकते. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरप करण्याचा विचारही कराल. विद्यार्थी आज मनाने अभ्यास करताना दिसतील. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. उच्च शिक्षणासाठी वेळ चांगला आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर तीही आज चांगल्या भावात विकता येईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल. मित्रांच्या मदतीने काही नवीन उत्पन्नाच्या संधी मिळतील

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. जे लोक कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळेल. ज्येष्ठ सदस्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. बहिणीच्या तब्येतीत सुधारणा होईल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसायात नवीन अधिकारी प्राप्त होतील. नोकरदार लोकांनाही नोकरीत स्थान बदल दिसून येईल. कार्यक्षेत्रात कोणालाही वाईट शब्द बोलू नका. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एका पार्टीत सहभागी व्हाल. तुमचे रखडलेले पैसे मिळतील. 

वृश्चिक

वृश्चिक राशीचे जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. भावाच्या लग्नात येणाऱ्या अडचणी संपतील, घरात शुभ कार्यक्रम होईल. सर्वजण एकत्र खरेदीला जातील. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

धनु

विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करताना दिसतील. ते आज काही क्रीडा स्पर्धेतही सहभागी होतील. त्यामध्ये ते जिंकतील. जे युवक घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करत आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या नातेवाईकांच्या मदतीनं तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुमच्या मुलांकडून मिळालेल्या सन्मानाने तुम्ही खूप आनंदी दिसाल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांचे रखडलेले पैसे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपासून दूर राहावे लागेल. कारण ते तुमच्याकडे आज पैशाची मागणी करतील. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. नोकरीतून आर्थिक लाभ मिळू शकतो.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. थांबलेले पैसे मिळतील. तुमचे कायदेशीर कामही संपेल. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलाचे आरोग्य सुधारेल.

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Grahan Dosh: 18 जुलैपर्यंत 3 राशींना धोका? सिंह राशीत धोकादायक ग्रहण दोष बनला, पैसा, नोकरीत बदल, ज्योतिषींचा सावध राहण्याचा सल्ला..
18 जुलैपर्यंत 3 राशींना धोका? सिंह राशीत धोकादायक ग्रहण दोष बनला, पैसा, नोकरीत बदल, ज्योतिषींचा सावध राहण्याचा सल्ला..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Embed widget