(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 22nd September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Unemployment In India: देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर
Unemployment In India: देशातील लोकांची बचत 50 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे आणि लोकांवर कर्जाचा बोजा वाढत आहे, असा अहवाल सर्वात आधी आरबीआयच्या (Reserve Bank of India) वतीनं जाहीर करण्यात आला. आता देशातील बेरोजगारीबाबत (Unemployment) एक अहवाल समोर आला आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे. वाचा सविस्तर
Chandrayaan-3 updates : चांद्रयान-3 मोहिमेसाठी आज महत्त्वाचा दिवस...चंद्रावर उगवणार सकाळ, 'प्रज्ञान' अॅक्टिव्ह होणार?
नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आता, 16 दिवसांच्या स्लीप मोडनंतर प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या विमानात प्रवाशाला मारहाण, नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न
Tripura Flight News: गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रवाशाने अमली पदार्थांच्या नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढच नाही तर यानंतर सहप्रवाशांनी या प्रवाशाला मारहाण देखील केली. विमानामध्ये घडलेल्या प्रकरानंतर विमानात भितीचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर
Parliament Special Session : संसदेच्या विशेष सत्राचे सूप वाजलं; महिला आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजलं. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप धनकड यांनी केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे म्हटले. वाचा सविस्तर
India vs Australia 1st Match: कोहली-रोहितशिवाय आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार टीम इंडिया; 'या' खेळाडूंवर खिळल्यात नजरा
India vs Australia 1st Match: यंदा एकदिवसीय विश्वचषकाचं (ICC World Cup 2023) यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आजपासून ऑस्ट्रेलियासोबत (Australia) होणारे टीम इंडियाचे (Team India) सामने 'ड्रेस रिहर्सल' असल्याचं मानलं जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरला आपला मॅच फिटनेस सिद्ध करावा लागेल, तर सूर्यकुमार यादवला एकदिवसीय क्रिकेटमधील आपला खेळ सुधारावा लागणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (22 सप्टेंबर) मोहालीत खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार असून वनडे मालिकेतील सर्व सामने याच वेळेत खेळवले जाणार आहेत. वाचा सविस्तर
22 September In History : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव, गुरू नानक यांचे निधन आणि भारत पाकिस्तामध्ये युद्धविराम घोषित
22 September In History : ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ( East India Company ) भारतासोबत व्यापार करण्यासाठी झाली. पण भारतातील श्रीमंत संस्थानांमधील भांडणे आणि कणखर नेतृत्वाचा अभाव पाहून या कंपनीच्या साम्राज्यवादी आकांक्षा जागृत झाल्या. त्यानंतर त्यांनी भारताचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेत 22 सप्टेंबरला विशेष महत्त्व आहे. खरं तर 22 सप्टेंबर 1599 मध्ये लंडनमध्ये 21 व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत भारतासोबत व्यवसाय करण्यासाठी कंपनी स्थापन करण्यावर विचार करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या दिशेने हे पहिले पाऊल म्हणता येईल. तसेच शिख धर्माची स्थापना करणाऱ्या गुरु नानक ( Guru Nanak ) यांचे निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. वाचा सविस्तर
22 September 2023 Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? कोणाला होईल लाभ? जाणून घ्या राशीभविष्य
22 September 2023 Horoscope Today : राशीभविष्यानुसार आज 22 सप्टेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांनी आज आपले काम पूर्ण समर्पण आणि मेहनतीने करावे, वृषभ राशीच्या लोकांना आज काही अडचणी येऊ शकतात. इतर राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर