एक्स्प्लोर
Corona Updates | राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद
राज्यात कोरोना संसर्गाने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 9 हजार 241 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार 114 रुग्ण बरे झाले आहेत. आज 14 हजार 492 नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 69 हजार 516 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. कारण, 14 हजारांहून अधिक रुग्ण बाधित होण्याचा तिसरा दिवस आहे. मुंबईत कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असेल तरी राज्यात मात्र वेगाने संसर्ग पसरत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्विक रुग्ण आहेत.
राज्याबाहेर तसंच राज्य अंतर्गत ई-पास वगैरे निर्बंध नकोत : केंद्र सरकार
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 35 लाख 66 हजार 288 नमुन्यांपैकी 6 लाख 71 हजार 942 नमुने पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आले आहेत. राज्यात 12 लाख 11 हजार 608 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 371 लोक संस्थात्मक क्वाॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 297 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.27 टक्के एवढा आहे.
राज्यात आज 297 रुग्णांचा मृत्यू
आज नोंद झालेल्या एकूण 297 मृत्यूंपैकी 251 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 19 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 27 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 27 मृत्यू हे ठाणे -7, पुणे -4, अहमदनगर -3, पालघर -2, उस्मानाबाद -2, नाशिक -2, कोल्हापूर -2, बीड -1, जळगाव -1, लातूर 1, नागपूर -1 आणि नांदेड -1 असे आहेत.
Ganesh Utsav 2020 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement