एक्स्प्लोर
Pune Land Scam: '...काहीही संबंध नाही' म्हणणारे Ajit Pawar, आता आरोपांवर भूमिका स्पष्ट करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर झालेल्या कथित जमीन घोटाळ्याच्या (Land Scam) आरोपांवर आता स्वतः अजित पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. 'आपल्या याच्याशी काहीही संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यापूर्वी देणारे अजित पवार आता सविस्तर भूमिका घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. पुण्यातील सरकारी जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यामुळे आता अजित पवार या पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती देतात आणि आरोपांचे खंडन कसे करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















