(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virar: मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले, बायकोच्या भितीने रचला लुटीचा बनाव
Virar: याप्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
Virar: मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले दहा लाख रुपये चोरट्यांनी लुटून नेल्याची तक्रार एका व्यापारानं वसई पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलीस चौकशीतून समोर आलेली माहिती ऐकून फिर्यादी व्यापाराच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. व्यापाऱ्यानं काही दिवसांपूर्वी बिटकॉईनमध्ये दहा लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्याला तोटा झाला. ज्यामुळं त्यानं बायकोच्या भितीनं दहा लाखाच्या लुटीचा बनाव आखल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात नोंद करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्याला समज देऊन त्याला सोडून दिलंय.
सुभंत यशवंत लिंगायत असं व्यापाऱ्याचं नाव आहे. वसईच्या पापडी येथील साई सर्व्हिस सेंटर समोर दहा लाख रोकड घेवून जात होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्याच्या हातातील रोकड घेऊन फरार झाला, अशी तक्रार सुभंत लिंगायत यांनी वसई पोलिसात दिली. मात्र, अवघ्या तासभरात पोलिसांनी त्याचा बनाव उघडं केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभंत लंगायत यांच्या मुलीचं 8 डिसेंबर रोजी लग्न आहे. यासाठी त्यांनी दहा लाख रुपये जमा केले होते. परंतु, मुलीच्या लग्नाआधीच त्यांनी या पैशांची बिटकॉईमध्ये गुंतवणूक केली. पण त्यांना बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला. बायकोला काय सांगायचं? असा पश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी दहा लाखांची रोकड चोरट्यानं चोरून नेल्याचा बनाव रचल्याचं पोलीत चौकशीतून समोर आलंय.
दरम्यान, साई सर्विस येथे रिक्षा थांबवून रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एका अज्ञात बाईकस्वारानं हातातील दहा लाखाची रोकड घेवून फरार झाला. दहा लाखाच्या रक्कमेतील सव्वा लाख मारुती सुझुकीची गाडी घेण्यासाठी आगावू रक्कम देण्यासाठी गेलेला. तसेच यातील काही रक्कम बोरीवली येथील काही व्यापाऱ्यांना द्यायची होती, असं व्यापाऱ्यानं तक्रारीत नमूद केलं होतं.
नवघर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, घटनास्थळावर पोलिसांना कोणताही पुरावा आढळला नाही. त्यानंतर पोलिसांनी व्यापाराची कसून चौकशी केली. त्यावेळी व्यापाऱ्यानं आपण हे पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले आणि तोटा झाला. ज्यामुळं आपण लुटीचा बनाव आखल्याचं व्यापाऱ्यानं मान्य केलं. याप्रकरणी पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात नोंद केली. तसेच व्यापाऱ्याला समज देऊन त्याला सोडून देण्यात आलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-