एक्स्प्लोर
महंत ग्यानदासांवर विनयभंगाचा खटला चालणार
नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यावर विनयभंगाचा खटला चालवण्यात येणार आहे. साध्वी त्रिकाल भवंता यांच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली असून ग्यानदास यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील वर्षी कुंभमेळाच्या ध्वजारोहणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच व्यासपीठावर महंत ग्यानदास आणि साध्वी भवंता यांच्यात वादावादी झाली होती. महंत ग्यानदास यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात विनयभंगांची तक्रार करणार असल्याचं साध्वी त्रिकाल भवंता यांनी सांगितलं होतं.
त्रिकाल भवंता यांनी या संदर्भात पोलिस स्टेशन गाठलं होतं. मात्र पोलिसांनी तक्रारी दाखल करुन न घेतल्याने साध्वी त्रिकाल भवंता यांनी कोर्टात धाव घेतली होती. याची दखल घेत आता वर्षभराने महंत ग्यानदास यांच्याविरोधात खटला चालणार आहे.
संबंधित बातम्या
महंत ग्यानदासांविरोधात विनयभंगाची तक्रार करणार : साध्वी त्रिकाल भवंता
आता स्वतंत्र ध्वजारोहणही पाहिजे! साध्वी त्रिकाल महंता आणखी आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement