एक्स्प्लोर
मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य
गडचिरोली येथील आयोजित कुणबी समाज मेळाव्यात त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

गडचिरोली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. त्यांनी जनतेला खोटे आश्वासनं देऊन सत्ता मिळवली'', असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. गडचिरोली येथील आयोजित कुणबी समाज मेळाव्यात त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ''भाजपने निवडणुकीत स्वामिनाथन समितीची शिफारस लागू करण्याचं आश्वासन दिले होतं, मात्र आश्वासन अजूनही पूर्ण केलं नाही. लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिलं जात नव्हतं'', असा आरोपही नाना पटोले यांनी केला. ''मोदींनी 2001 पासून गुजरातमध्ये ओपन गटातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी तेली दाखवून लोकसभा निवडणूक लढवली. मोदी हे तेली, कुणबी आणि ओबीसीही नाहीत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही'', असं लक्षात आल्यानंतरच भाजपशी विद्रोह करुन खासदारकीचा राजीनामा दिला, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. बातमीचा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























