आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव; सचिन सावंत यांचा आरोप
आंतराष्ट्रीय मदतीचे वितरण करताना महाराष्ट्राला डावललं जाऊन केवळ भाजप शासित राज्यांना मदत केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केलाय.
मुंबई : कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना भारताला जगभरातील 40 देशांकडून मदत पुरवण्यात येत आहे. केंद्रातले मोदी सरकार ती मदत केवळ भाजप शासित राज्यांना देत असून महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. या प्रकरणी राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी एका गुजराती वृत्तपत्रातील आलेल्या माहितीच्या हवाल्याने मोदी सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणतात की, "40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार, एमपी, हरियाणा, गुजरात इत्यादी राज्ये त्या यादीत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. मोदी सरकारचा जाहीर निषेध."
40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार,एमपी, हरियाणा, गुजरात इ.राज्ये आहेत. @Dev_Fadnavis जी उत्तर द्या! मोदी सरकारचा जाहीर निषेध pic.twitter.com/0bAFrpet4U
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 7, 2021
सचिन सावंत पुढे म्हणतात की, "सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे, तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे."
काँग्रेसच्या आरोपाला आता राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेते काय उत्तर देतात हे पहावं लागेल.
भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. त्यामुळे देशाला जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला असून आतापर्यंत जगभरातील 40 देशांनी वेगवेगळ्या साहित्यांची मदत केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- India Corona Cases Yesterday : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे कोरोनाबाधित, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू
- Tamil Nadu : तामिळनाडूच्या स्टॅलीन सरकारमध्ये 'गांधी' आणि 'नेहरूं'चा समावेश
- PM modi Corona Review Meeting : पंतप्रधान मोदींकडून देशातील कोरोना स्थितीचा आढावा, लसीकरण मोहीम जलद करण्याच्या सूचना