India Corona Cases Yesterday : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे कोरोनाबाधित, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू
India Corona Case Updates : भारतात कोरोनाचा वाढता कहर दिसून येत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
India Corona Case Updates : भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज समोर येणारे कोरोनाबाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एवढंच नाहीतर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाचनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 14 लाख 91 हजार 598
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 72 लाख 12 हजार 351
एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 45 हजार 164
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 34 हजार 083
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 16 कोटी 49 लाख 73 हजार 58 डोस
राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 63,842 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.54% एवढा झाला आहे. तर आज राज्यात दरम्यान काल 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,26,089 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,406 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गुरुवारी 3056 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत काल एकूण 3056 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 2 हजार 383 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 50 हजार 606 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 130 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (29 एप्रिल-3 मे) 0.51 टक्क्यांवर गेला आहे.
लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिला
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असली तरी त्याला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यामध्येही महाराष्ट्र पहिला आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :