PM modi Corona Review Meeting : पंतप्रधान मोदींकडून देशातील कोरोना स्थितीचा आढावा, लसीकरण मोहीम जलद करण्याच्या सूचना
PM modi Corona Review Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये असून दुसऱ्या लाटेतील कोरोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीवेळी लसीकरण मोहिम जलद करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
PM modi Corona Review Meeting : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी देशातील राज्यांची आणि जिल्ह्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ज्या राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानांनी तेलंगणा, आँध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधानांना त्या राज्यांबाबात माहिती देण्यात आली, जिथे 1 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तसेच पंतप्रधानांना कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या देशातील जिल्ह्यांबाबतही सांगण्यात आलं. पंतप्रधानांना राज्यांद्वारे आरोग्य सेवा मजबूक करण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीसंदर्भातही माहिती दिली गेली.
आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आरोग्य सेवां आणखी मजबूक करण्यासाठी काम करण्यात यावं, असे निर्देश दिले. याव्यतिरिक्त जलद आणि सर्वांगीण प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही चर्चा करण्यात आली.
केंद्रानं राज्यांना कोरोनामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची ओळख पटवण्यासाठी एक अॅडवायझरी पाठवण्यात आली होती. जिथे कोरोना रुग्णांची संख्या 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून अधिक भरलेले आहेत. त्या जिल्ह्यांची वेगळी वर्गवारी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तसेच पंतप्रधानांनी औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. त्यांनी रेमडेसिवीरसह इतर औषधांच्या उत्पादनात वाढ करण्याबाबत सुरु असेलल्या प्रयत्नांबाबतही माहिती देण्यात आली.
पंतप्रधानांनी पुढिल काही महिन्यांमध्ये लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी लसीकरण आणि रोडमॅपची प्रगती यासंर्भात आढावा घेतला.
पंतप्रधानांना यासंदर्भात सांगण्यात आलं की, राज्यांना जवळपास 17.7 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी लसीच्या अपव्ययांबाबतचा राज्यवार आढावा घेतला. तसेच पंतप्रधानांनी सांगितलं की, 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येच्या जवळपास 31 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी लसीकरणासाठी काही सूचनाही केल्या.
या बैठकीमध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारमण, डॉ. हर्षवर्धन, पीयूष गोयल आणि मनसुख मांडविया यांच्यासह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रभाव वाढतानाच दिसत आहे. गुरुवारी 4,12,262 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3,980 रुग्णांनी आपला जीव गमावला. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2,10,77,410 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 2,30,168 वर पोहोचला आहे.