एक्स्प्लोर

मोठी बातमी! मनसे महायुतीत सहभागी होणार?; मनसे नेत्यांकडून एकनाथ शिंदेंसह फडणवीसांची भेट

MNS News : मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता. 

MNS News : मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 8-10 दिवसात पुन्हा बैठक होऊ शकते. ज्यात काही फॉर्म्युला वर चर्चा होऊ शकते. त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता. 

राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना देखील वेग येतांना पाहायल मिळत आहे. मनसेचे नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतानाच, आता मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच लवकरच तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. 

भेटीगाठी वाढल्या...

मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याची काही कारणं देखील आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मागील काही दिवसांत सतत गाठीभेटी होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गट आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या देखील भेटीगाठी होतांना पाहायला मिळत आहे. त्यातच मनसेचे नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे या सर्व भेटी पाहता मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

मनसे नेत्यांची फडणवीसांसोबत गुप्त भेट...

मागील काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनसे- भाजप यांच्या युतीबाबत अनेकदा चर्चा झाली. सोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील फडणवीसांसोबत बैठक झाली असल्याचे म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

भाजप मनसे युती होणार?; मनसेच्या नेत्यांची फडणवीसांसोबत गुप्त भेट; युतीच्या चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati: पवार साहेब माझे गुरू; मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीनAmit Thackeray Exclusive : लोकांचा साहेंबांवर विश्वास; आमचं व्हिजन घेऊन निघालो आहोत - अमित ठाकरेEknath Shinde File Nomination : अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघेंना वंदनYugendra Pawar File Nomination :  युगेंद्र पवारांकडून सु्प्रिया सुळेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
"महायुतीनं RPI ला एकही जागा दिली नाही, पण..."; विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
Nashik Crime News : खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
खासगी वाहनावर लाल-निळा दिवा, पोलिसांची वर्दी घालून तोतया आयपीएसचा कारनामा, नाशकात व्यावसायिकाला तब्बल 1 कोटीचा गंडा
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!
Embed widget