एक्स्प्लोर
मंत्री ऐकत नसल्यास कांदे फेकून मारा : राज ठाकरे
शेतकऱ्यांनी मंत्री आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचं राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
नाशिक : नाशिक दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.
कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली. त्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचं राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या दिंडोरी भागात आज सकाळी राज ठाकरे आले असता त्यांच्या स्वागतासाठी तरुणांची मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं.
गर्दीमुळे राज ठाकरेंना गाडीतून उतरण्यासाठीही अडचण झाली. अखेर गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पण राज ठाकरेंना मिळणारा हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत होतो का, हे पाहणं महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement