एक्स्प्लोर
परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक थेट समुद्रात
सिंधुदुर्गातल्या मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. परराज्यातल्या या हायस्पीड ट्रॉलर मासळीची लूट करुन पारंपरिक मच्छिमारांची जाळीही तोडून जात आहेत.
सिंधुदुर्ग : तळकोकणातील समुद्रात होणारी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक थेट समुद्रात गेले. आमदार वैभव नाईक मंगळवारी (17 सप्टेंबर) रात्री उशिरा मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेतून अधिकाऱ्यांसोबत मालवणच्या समुद्रात उतरले आणि घुसखोरी करणाऱ्या हायस्पीड बोटींवर कारवाईसाठी पाठलागही केला. तीन ट्रॉलरला पकडण्यात आलं.
सिंधुदुर्गातल्या मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. परराज्यातल्या या हायस्पीड ट्रॉलर मासळीची लूट करुन पारंपरिक मच्छिमारांची जाळीही तोडून जात आहेत. रात्रीच्या वेळी शेकडोंच्या संख्येने हे ट्रॉलर घुसखोरी करत असताना, महाराष्ट्राचा मत्स्य विभाग मात्र त्याविरोधात कारवाई करण्यास हतबल दिसत आहे.
दरम्यान, काल रात्रीही हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरु होती. ही घुसखोरी रोखण्यासाठी वैभव नाईक अधिकाऱ्यांसह गस्ती नौकेतून समुद्रात गेले. यावेळी 15 ते 20 हायस्पीड ट्रॉलर अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळले. यापैकी काही ट्रॉलर पळून गेले तर गुजरातच्या तीन ट्रॉलरना पकडण्यात यश आलं. या ट्रॉलरवर कारवाई केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement