मोठी बातमी! 2012 मध्ये माझं एन्काऊंटर करण्याचा डाव, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप
आमदार सदाभाऊ खोत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2012 साली माझे एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 2012 सालच्या तत्कालीन आघाडी सरकारवर त्यांनी हा आरोप केला आहे. तसेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत खोतांनी अजित पवारांना सोबत घेण्याचं त्यांनी समर्थन केलं आहे.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
2012 ला इंदापूरला उसाचं आंदोलन सुरू होतं. चंद्रकांत नलवडे हा शेतमजुराचा पोरगा टेम्पोच्या आडोशाला उभं राहून आंदोलन बघत होता. पोलिसांनी समोरून जाऊन त्याला गोळी घातली. त्यावेळी मला येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. तेव्हा बाहेर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तेव्हा सगळे रस्ते पॅक होते. मला तेव्हा पोलिसांनी आत येऊन सांगितलं की जामीन स्वीकारा आणि बाहेर येऊन सगळं शांत करा. मी जामीन स्वीकारून बाहेर आलो. तीन ते चार गाड्या बाहेर उभ्या होते. या गाडीत बसा, त्या गाडीत बसा मला असं पोलीस सांगत होते. मी विचार करत होतो, यांनी मला एवढ्या चांगल्या गाड्या बसायला कशा आणल्या. मी त्या डीवायएसपीचं नाव घेणार नाही. मला त्यांच्या नोकरीवर गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत-चालत हळूच सांगितलं की भाऊ जिथं-जिथं एक दोन ठिकाणी आंदोलनाची दंगल चालू आहे, तिथं तुम्हाल न्यायचं आहे आणि तुमचं एन्काऊंटर करायचं आहे, असं खोत यांनी सांगितलं.
खोत यांनी मागितली जाहीर माफी
सदाभाऊ खोत काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी एका जाहीर सभेत खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. सोबतच ही टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका झाली. भाजपाच्या नेत्यांनीही खोत यांच्या विधानावर असहमती दर्शवली होती. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात गजहब उडाल्यामुळे शेवटी खोत यांनी त्यांच्या विधानाबाबत जाहीर माफी मागितली होती.
Sadabhau Khot Video News :
हेही वाचा :
Sadabhau Khot On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळले