एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे माथाडी कामगारांचे नेते भाजपच्या वाटेवर?

नवी मुंबई: माथाडी कामगारांच्या प्रश्नावर 'एकला चलो रे'ची भूमिका घेतलेले आमदार नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीगाठीमुळे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून त्यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर देत, आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. ''मागील सरकारने माथाडी कामगारांचे प्रश्न न सोडवता त्यांना झुलवत ठेवले. मात्र, विद्यमान सरकार माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. यामुळे या सरकारमुळे जर माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवणार असेल, तर त्यांच्याकडे जाण्यात माझं काय चुकलं,'' असा प्रश्न उपास्थित करून आमदार पाटील यांनी पक्षाला घराचा आहेर दिला आहे. ''मुख्यमंत्री हे माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत जर सकारात्मक असतील, तर त्यांना भेटण्यात काय चूक असा प्रश्न उपस्थित करून यासाठी मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी त्याची परवा नाही,'' असा इशाराच नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
आणखी वाचा























