एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासाठी सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं. आरक्षणाची मागणी करत मराठा समाज राज्यभर आंदोलन करत आहे. या आंदोलनात पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. काल (24 जुलै) आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला इशारा दिला होता की, उद्यापर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन. अखेर आपल्या इशाऱ्याला जागत हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केली. यानंतर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, मराठा आमदारांनी विधानमंडळात आरक्षणाची मागणी लावून धरावी, यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मराठा आमदारांविरुद्ध निदर्शने केली आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























