एक्स्प्लोर

आमदारकीसाठी ´पण´ करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमदार पडळकरांकडून चांदीची चप्पल अन् दुचाकी देऊन सत्कार

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार केला आहे. आमदारकीसाठी पण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांदीची चप्पल आणि दुचाकी देऊन पडळकरांनी सत्कार केलाय.

सांगली : नेत्यासाठी काय'पण' म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा पार पडला आहे. जोपर्यंत आपला नेता आमदार होत नाही, तोपर्यंत वेगवेगळे 'पण' करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा चांदीची चप्पल आणि दुचाकी देऊन सन्मान करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान सोहळा आटपाडीच्या झरे याठिकाणी पार पडला आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या झरे या ठिकाणी राजकारणातला एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला आहे. मात्र, हा सत्कार कोणा नेत्याचा नव्हता तर नेत्याकडून कार्यकर्त्यांचा होता. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. पडळकर यांच्या 3 कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर हे आमदार व्हावेत यासाठी 'पण' केला होता. दोघा कार्यकर्त्यांनी जोपर्यंत गोपीचंद पडळकर आमदार होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा 'पण'केला होता.

आटपाडीच्या कटरेवाडी येथील गॅरेजमध्ये काम करणारे दत्तात्रय कटरे यांनी 2006 पासून तर पुजारवाडी येथील वीट भट्टी कामगार नारायण पुजारी यांनी 2009 पासून चप्पल न घालण्याचा तर झरे येथील सलून व्यासायिक दिवंगत जालिंदर क्षीरसागर पडळकर यांच्याकडून केस, दाढीचे पैसे न घेण्याचा पण केला होता. अशा या निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार पडळकर यांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात चप्पल न घालणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि दुचाकी प्रदान केली. तर केस व दाढीसाठी पैसे न घेणाऱ्या कुटुंबाला दुचाकी भेट देण्यात आली.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, साताऱ्याच्या माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायात ही चांदीची चप्पल घातली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले. महाराष्ट्रातील राजकारणाला आदर्श घालणारा हा सोहळा असल्याचं मत व्यक्त केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget