आमदार अपात्रतेचा निकाल ही तर मॅच फिक्सिंग, पंतप्रधान मोदींना निर्णय माहित म्हणूनच महाराष्ट्र दौरा; संजय राऊतांचा गंभीर आरोप
आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग असून निकाल माहित असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट झाली. निकालाअगोदर झालेल्या भेटीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. नार्वेकर आणि शिंदेची भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग असून निकाल माहित असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग आहे. निकाल माहित असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौऱ्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा डावोस दौऱ्यावर आहेत.प्रधानमंत्र्यांना निर्णय माहित आहे म्हणून ते दौऱ्यावर येत आहेत. मॅच फिक्सिंग आधीचं झालयं म्हणून मुख्यमंत्र्यांचा ही डावोसचा दौरा आधीच फिक्स झाला विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटत नाही. परंतु तुम्ही का गेलेत आम्हाला माहित आहे
घटनाबाह्य सरकारने घेतलेले निर्णय हे घटनाबाह्य : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, शिंदे गटानं नेमलेला व्हिप हा बेकायदेशीर आहे. हा सर्वोच्च न्यायलयानं दिलेला निर्णय आहे. दीड वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार राज्यात आहे. घटनाबाह्य सरकारने घेतलेले निर्णय हे घटनाबाह्य आहेत.
देवेंद्र फडणवीसांना निकाल माहिती आहे : शरद पवार (Sharad Pawar On Devendra Fadnavis)
राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे.
न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? उद्धव ठाकरेंचा सवाल
न्यायमूर्ती (राहुल नार्वेकर) आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत UBT शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
हे ही वाचा :