एक्स्प्लोर

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे सुनावणीला हजर

शिंदे गटाचे वकिल अनिल साखरे यांच्याकडून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारले जात आहेत.  राहुल शेवाळे यांनी आपल्या साक्षीत  कार्यकारिणी ठराव झाला नसल्याची माहिती दिली आहे. 

Shiv Sena MLA Disqualification Case :   शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधिमंडळात सुरू आहे.  काल झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांची तर दुपारच्या सत्रात योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली. 25 ऑक्टोबर 2023 च्या प्रतिज्ञापत्रातल्या चुकांवरुन आमदार कदम यांना सवाल विचारण्यात आले होते. शिंदे गटाचे वकिल अनिल साखरे  यांच्याकडून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारले जात आहेत.  राहुल शेवाळे यांनी आपल्या साक्षीत  कार्यकारिणी ठराव झाला नसल्याची माहिती दिली आहे. 

खासदार राहुल शेवाळे यांच्या सुनावणीतील प्रश्नोत्तरे :  

 साखरे:   23 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी काय आहे? 

राहुल शेवाळे: मी शिवसेनेत 2000 सालापासून सदस्य आहे. 23 जानेवारी हा दिवस आमच्या सारख्या सर्व शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यादिवशी वाढदिवस असतो. राज्यातील सर्व शिवसैनिक एकत्र येत हा दिवस साजरा करतात. त्या दिवशी सर्व नेते भाषण करतात आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात.

27  फेब्रुवारी 2018 चे पत्र राहुल शेवाळे यांना दाखवण्यात येत आहे. 23 फेब्रुवारी  2018  रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीचा हा ठराव आहे.

(शिवसेनेच्या कार्यकारिणी निवडीचा ठराव 23फेब्रुवारी 2018  रोजी मंजूर झाला. त्याची प्रत 27 फेब्रुवारी 2018 रोजी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. खासदार अनिल देसाई यांच्या सहीच्या ठरावाची ही प्रत राहुल शेवाळे यांना दाखवण्यात येत आहे.)

अनिल साखरे : या पत्राबाबत काय सांगायचे असेल तर सांगा. 

राहुल शेवाळे यांच्याकडून कार्यकारिणी ठराव झाला नसल्याची माहिती

हा ठराव प्रथमच पाहत असल्याची दिली साक्ष

राहुल शेवाळे :  हे पत्र मी पहिल्यांदाच पाहत आहे. ही खोटी माहिती दिलेली आहे.

25 जून 2022 ला मी सेना भवन ला गेलो होतो..सेना भवन हे माझ्या लोकसभा मतदारसंघात येत. मी नेहमी सेना भवनाला नेहमीच जात होतो. त्यावेळी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत 25 तारीख पूर्वी आम्ही सर्व खासदारांनी बैठक घेतली. तेव्हा असे ठरवलं होतं की उद्धव ठाकरे यांना एन डी एमध्ये सामील व्हा अशी आम्ही विनंती करणार होतो. 25 तारीखला आम्ही सर्व जण उद्धव ठाकरे येणार होतो म्हणून गेलो. आम्ही उद्धव ठाकरेंना आम्ही तिथे भेटलो. 2019 ला आपण एनडीए म्हणून निवडणूक लढवली होती. मतदारानी महायुती म्हणून निवडून दिले होते. मोदींजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली होती. त्यामुळे आपण एनडीए मध्ये सामील झाल पाहिजे हे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी जो मविआचा निर्णय घेतला त्यामुळे मतदार नाराज झालेले आहेत. 2024 ची निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला मोदींजींच्या नेतृत्वाखाली लढली पाहिजे असे आम्ही त्यांना सांगितले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. 370 कमल हटवले, राम मंदिर बाबत निर्णय घेतला त्यामुळे आपण भाजप सोबत जायला हवं असे आम्ही सांगितले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितले होते की मी काँग्रेससोबत जेव्हा जाईन तेव्हा मी माझं दुकान बंद करेन.. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला त्रास देत आहेत आणि त्यांना काम करण्यास अडचणी निर्माण करत आहेत असे आम्ही त्यांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आमचं हे म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले मी माझं म्हणणं तुम्हाला कळवतो.

शेवाळे : कुठल्याही प्रकारे ठराव 25 जून 2022 रोजी पारित झाला नाही
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1999 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली. ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे कधीही दुरुस्ती करण्यात आली नाही 

1999 च्या घटनेची प्रत शिंदे गटाकडून सादर करण्यात आली. या प्रतीवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. ही प्रत रेकॉर्डवर नसल्याचा ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद केला. याउलट ही प्रत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा शिंदे गटाच्या वकिलांकडून सांगण्यात आला आहे. 

( प्रत रेकॉर्ड वर घेण्याचा विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय)

याआधी ठाकरे गटाच्या वकिलांची कागदपत्रे ही रेकॉर्डवर घेतल्याचा दिला दाखला. या सुनावणीत हे कागदपत्र प्रथमच सादर केला जात असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप अध्यक्षांकडून रेकॉर्ड वर नोंदवण्यात येत आहे. याआधी संधी देऊनही साक्षीदारांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत, असेही ठाकरे गटाच्या वकिलांनी नोंदवले आहे. शिंदे गटाच्या वकिलांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेत हे प्रश्न रेकॉर्डवर घ्यावे ज्याप्रकारे प्रश्न साक्षी दाराच्या बाजूने विचारले जातत आहे अस म्हणत अशी विनंती केली 

अध्यक्ष : तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर घेणार नाही. मी पूर्ण पणे प्रक्रियेनुसार जातोय. मला सर्वोच्च न्यायालयाने दिल्या मर्यादित वेळेत सगळी सुनावणी पूर्ण करून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर आणली जाणार नाही. जे महत्वाचा मला वाटलं ते मी रेकॉर्डवर घेतोय प्रत्येक छोट्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या तर वेळ पुरणार नाही 

साखरे - 23 जानेवारी 2018 रोजी बैठकीत घटनेबाबत कुठली चर्चा झाली का ?

शेवाळे - नाही कुठलीही चर्चा झाली नाही

साखरे - 2014 ते 2022 दरम्यान शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली का ? 

शेवाळे- अशी कोणतेही बैठक झाली नाही आणि मला बोलवलं पण नाही

साखरे - जून 2014 ते जून 2022 तुम्ही कुठली पक्षाची प्रतिनिधी सभा मध्ये सहभागी झाला का ?

शेवाळे- कुठलीही प्रतिनिधी सभा झाली नाही आणि मला अधिकृतरित्या बोलवलं गेलं की नाही

साखरे - लोकसभेमध्ये पक्षाचा गटनेता कसा निवडतात ? 

शेवाळे- लोकसभा सदस्य गटनेता निवडतात आणि शिवसेना पक्षाच्या खासदारांनी मला गटनेता निवडला. शिवसेनेच्या 19 लोकसभा खासदारांनी मला गटनेता म्हणून निवडला, याला लोकसभा अध्यक्षांची संमती होती

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget