एक्स्प्लोर
Advertisement
‘महापरीक्षा’ पोर्टलविरोधात बच्चू कडूंच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन
सरकारने महापरीक्षा पोर्टल संदर्भात पुढील 10 दिवसात योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयात आंदोलन करु, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.
नागपूर : नागपुरात ‘महापरीक्षा’ पोर्टलविरोधात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ‘महापरीक्षा’ पोर्टलची पद्धत भ्रष्ट आणि कुचकामी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे या पोर्टलऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक स्वरुपात पदवी प्रमाणपत्र जाळून आणि काही विद्यार्थ्यांनी मुंडन करुन आपला रोष व्यक्त केला.
रेशीमबाग परिसरात जैन कलार सभागृहात झालेल्या या आंदोलनासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. गेल्या काही महिन्यांपासून विविध विभागांमधील नोकर भरती प्रकरणी सरकारने महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घ्यायला सुरुवात केलीय. त्यासाठी राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या संगणक केंद्रांवर महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा आयोजित केली जाते. मात्र, अशा परीक्षा केंद्रांवर संगणक जुनाट आणि कुचकामी असतात, ते वेळेवर चालत नाही, बंद पडतात, अशा केंद्रांवर अनेक ठिकाणी भ्रष्ट कारभार होऊन ठराविक स्पर्धकांना कॉपी करण्याची संधी दिली जाते, असा आरोप स्पर्धक विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा निष्पक्ष राहत नाही, असा आरोप स्पर्धक विद्यार्थ्यांनी केला आहे.
सरकारने महापरीक्षा पोर्टल संदर्भात पुढील 10 दिवसात योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयात आंदोलन करु, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या :
- महापरीक्षा पोर्टल बंद करुन सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात.
- एमपीएससीचीसंयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे स्वतंत्र PSI/STI/Asst. च्या परीक्षा घेण्यात याव्यात.
- एमपीएससीने उत्तरपत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा.
- राज्यशासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी.
- तलाठी पदाची परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी
- 18 हजार शिक्षक भरती त्वरित करावी.
- सहाय्यक वाहन मोटार निरीक्षक नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील करुन नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली, त्याच पदासाठी पुन्हा बसण्यास बंदी घालावी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement