एक्स्प्लोर

प्रियकरासह अल्पवयीन तरुणीची स्वतःच्याच घरी दागिन्यांची चोरी

औरंगाबाद : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. मात्र औरंगाबादमधील एका अल्पवयीन मुलीनं प्रियकरासाठी केलेला गुन्हा तिला चांगलाच महागात पडला आहे. प्रियकराच्या सांगण्यावरुन घरातील दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अक्षय वाहूळ नावाच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयनं अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन तिला आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारायला सांगितलं. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं देखील आईचा विचार न करता घरातील दागिने आणि रक्कम चोरली. भाजी विकून आपल्या एकुलत्या एक मुलीसह उदरनिर्वाह करतात. 17 मार्चला त्यांच्या घरी चोरी झाली. मुलीच्या लग्नासाठी एक-एक रुपया जमा करुन विकत घेतलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं लक्षात येताच आई हतबल झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा घराचं कुलूप उघडताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शिवाय ज्या पोटीत सोनं ठेवले होतं, त्याची तेलाच्या किटलीत ठेवलेली चावी चोरट्यांना सहज सापडल्याने पोलिसांची शंका बळावली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रियकराच्या मदतीने आपण दागिने लांबवल्याची कबुली तरुणीने दिली. आरोपी प्रियकराने यापूर्वीही चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलीने चोरी केली आहे, तर तिला शिक्षा व्हायलाच हवी, असा पवित्रा आईनं काळजावर दगड ठेवत घेतला आणि मुलीविरोधात तक्रार नोंदवली. या चोरीप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, तर तिचा प्रियकर तुरुंगाची हवा खात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj Vs Matthew Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj Vs Matthew Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
Embed widget