Shambhuraje Desai : गटारी अमावस्या! खबरदार अवैध मद्याची वाहतूक कराल तर, मंत्री शंभूराज देसाईंचे कारवाईचे आदेश
Nashik News : आजच्या गटारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क असून अवैध मद्य विक्रीवर कडक नजर ठेवून आहेत.
Nashik News : एकीकडे आज आषाढ महिन्याचा (Ashadh) शेवटचा दिवस असून आज दीप अमावस्या साजरी करण्यात येत आहे. अर्थातच आज गटारी अमावस्या (Gatari Amavasya) असून त्यातच रविवार आल्याने गटारी साजरी करणाऱ्यांकडे अनेकांचा कल आहे. गटारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून अवैध मद्याची वाहतूक होणार नाही तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
यंदा श्रावण दोन महिन्यांचा असल्याने मंगळपासून श्रावण (Shravani Somwar) सुरुवात होत आहे. त्यामुळे आजचा दीप अमावस्या साजरी करण्यात येत आहे. मंगळवारपासून अधिक मास (Adhik Maas 2023) सुरु होणार असून हा अधिक मास 17 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. त्यानंतर निज श्रावण सुरु होईल या काळात महाराष्ट्रात अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे श्रावण सुरु होण्याचा आदल्या दिवशी गटारी साजरी केली जाते. सोमवारी अमावस्या येत असल्याने आजच मासांहारावर ताव मारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे.
आज मंत्री शंभूराजे देसाई हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या गटारीच्या पार्श्वभूमीवर विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गटारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास कठोर कारवाई केली जाण्याचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी देसाई यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.
यावेळी शंभूराजे देसाई यांनी सुनील राऊत यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, कलंक म्हटल्याने कुणी कलंक होत नाही. याआधीही विरोधी पक्षाचा अधिवेशनावर बहिष्कार हा नित्यनेम झाला आहे. मात्र यावेळी मी सुनील राऊत यांना सांगतो, तुम्ही चहापानाला या. आपले प्रश्न मांडा. सरकार सत्ताधारी आणि विरोधक हा भेदभाव करणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सद्यस्थितीत महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून त्यावर देसाई म्हणाले की, तिन्ही इंजिन एकमेकांच्या समन्वयातून चालतील. येणाऱ्या काळात या सरकारच्या कामाचा वेग वाढल्याचे दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि फडणीस यांच्याशी समन्वय साधून पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, असेही सूतोवाच शंभूराजे देसाई यांनी दिले.
राज्यात गटारीचा उत्साह
श्रावण महिन्यास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. आज गटारी अमावस्या निमित्ताने चिकन मटण घेण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. आषाढातील शेवटच्या रविवार असल्यामुळे राज्यातील अनेक भागात मोठ्या संख्येमध्ये नागरिक मटण घेण्यासाठी दुकानावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
संबधित बातम्या :