एक्स्प्लोर

Aashadh Deep Amavasya 2022 : कधी आहे आषाढ दीप अमावस्या? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, तिथी आणि वेळ

Aashadh Deep Amavasya 2022 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.

Aashadh Deep Amavasya 2022 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.

आषाढ अमावस्येनंतर हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना श्रावण महिन्याची सुरूवात होते. यंदा हा श्रावण मास 29 जुलैपासून शनिवार 27 ॲागस्ट 2022 पर्यंत पाळला जाणार आहे. त्यामुळे या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला दीप अमावस्या साजरी करण्याची जुनी परंपरा आहे.

दीप अमावस्या 2022 तारीख, तिथी वेळ : 

यंदा आषाढ महिन्यात अमावस्येची सुरूवात 27 जुलै दिवशी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तर अमावस्येची समाप्ती 28 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे दीप अमावस्या 28 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे.

दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे. या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.

दीप अमावस्या पूजा पद्धत :

  • दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडतात.
  • या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.
  • दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करतात.
  • त्यांची पूजा करतात. पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: कुलदेवता आणि इष्टदेवता यात मोठा फरक? कुळाचारात दोघांनाही महत्त्वाचे स्थान? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
कुलदेवता आणि इष्टदेवता यात मोठा फरक? कुळाचारात दोघांनाही महत्त्वाचे स्थान? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Pitru Paksha 2026: पितृपक्ष संपताच 'नवरात्रौत्सव' का सुरू होतो? आधी पूर्वजांचे श्राद्ध, मग आदिशक्तीची उपासना का करतात? निसर्गाशी जोडलेले सुंदर चक्र, धार्मिक मान्यता...
पितृपक्ष संपताच 'नवरात्रौत्सव' का सुरू होतो? आधी पूर्वजांचे श्राद्ध, मग आदिशक्तीची उपासना का करतात? निसर्गाशी जोडलेले सुंदर चक्र, धार्मिक मान्यता...
Pitru Paksha 2026: आज तृतीया आणि भरणी श्राद्धाचा दुर्मिळ संयोग! श्राद्धाचा आजचा मुहूर्त कोणता? भरणी श्राद्ध कोणासाठी करतात? पितृदोष मुक्तीचं महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आज तृतीया आणि भरणी श्राद्धाचा दुर्मिळ संयोग! श्राद्धाचा आजचा मुहूर्त कोणता? भरणी श्राद्ध कोणासाठी करतात? पितृदोष मुक्तीचं महत्त्व जाणून थक्क व्हाल...
2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 3 महिने गेमचेंजर! ऑक्टोबर ते डिसेंबर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget