ना तटकरे, ना गोगावले, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री रामदास आठवलेंनी सांगितला नवा तोडगा
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा अद्याप काही सुटला नाही. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आऐठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ramdas Athawale : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा (Raigad Guardian Minister) तिढा अद्याप काही सुटला नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत. तसेच मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना देखील जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ( आरपीआई) द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
रायगडचं पालकमंत्रीपद आरपीआय पक्षाला मिळावं
भरत गोगावले हे पहिले मंत्री पदासाठी आग्रही होते आता पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत असे रामदास आठवले म्हणाले. केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी चवदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं. रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्या आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मंत्री अदिती तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा वाद सुरू आहे. मात्र आता हा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्री पद आम्हाला मिळावं अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
कोणत्याही मुस्लिम नागरिकाने औरंगजेबाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये
औरंगजेब हा अत्यंत क्रूर आणि खतरनाक माणूस होता. औरंगजेबाने आपल्या देशात येऊन अनेक लढाया जिंकल्या, मात्र त्याला आपल्यातीलच काही फितूर मिळाल्यामुळेच जिंकल्याचे रामदास आठवले म्हणाले. परंतू, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी त्यांचा ताकदीने विरोध केला, म्हणूनच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केल्याचे आठवले म्हणाले. औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक आहे. कोणत्याही मुस्लिम नागरिकाने औरंगजेबाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये. औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक आणि आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी आला होता. मात्र अशा औरंगजेबाला आणि मोघलांना गाढण्याच काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केल्याचे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Raigad Guardian Minister : भरत गोगावले की अदिती तटकरे, पालकमंत्रिपदाच्या वादात रायगड जिल्ह्याच्या विकासाचा खोळंबा, माजी आमदाराचा प्रहार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

