एक्स्प्लोर

25368 कोटींच्या 10 प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, उदय सामंत यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

10 प्रकल्पांना मागील तीन महिन्यात आम्ही मान्यता दिली, त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि आम्ही या प्रकल्पांना मान्यता दिली, असे उदय सामंत यांनी सांगितलं.

Uday Samant : 25368 कोटींच्या 10 प्रकल्पांना मागील तीन महिन्यात आम्ही मान्यता दिली, त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि आम्ही या प्रकल्पांना मान्यता दिली, असे राज्याचे उदयोगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. उदयोगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. एअरबस आणि वेंदाता प्रकल्पाबाबत काही कागदपत्र त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावेत, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही केला. सरकार गेल्यानंतर राग असू शकतो. पण राग किती काढायचा? यालाही बंधने आहेत. एअरबसच्या बाबात सरकारची बैठक झालीच नाही. स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु होती, असे आयएस अधिकारी सांगू शकतो. आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्याचा राग आहे, असेही यावेळी सामंत यांनी सांगितलं.   

सरकार घटनाबाह्य आहे, कृषीमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, उद्योगमंत्र्यांनी राजीमाना दिला पाहिजे असे आरोप करत आदित्य ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेलाच विरोध केला आहे. राजीमाना मागण्यापर्यंतचे राजकीय आरोप मी समजू शकतो. पण आदित्य ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांनी कागदपत्र द्यावीत, असे उदय सामंत म्हणाले. 

एअरबसच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारची टाटासोबत झालेल्या बैठकीतील पुरावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावेत, अशी विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेला काही कागदपत्र देतील असं वाटलं होतं. पण ही सर्व पत्रकार परिषद ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर काही कागदपत्र सादर करत आहे. 

एप्रिल 2020 मध्ये ज्या ठिकाणी मिहान प्रकल्प होतोय, त्या ठिकाणीच पूर्वीपासून टाटाची एक कंपनी कार्यकरत आहे.  त्या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यानं एअरबससाठी लागणारी जागा, मिहानमध्ये मिळेल का? अशी चौकशी त्यावेळी त्यांनी केली होती. आयएएस अधिकारी दिपक कपूर याबाबत सविस्तर सांगू शकतात. 

एअरबस प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये आणण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न झाल्याची कागदपत्रे नाहीत, असे सामंत म्हणाले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं कोणता पुढाकार घेतला? एअरबसच्या किती बैठका घेतल्या? किती पत्रव्यवहार केला? कुणाबरोबर बैठका घेतल्या? मुख्यमंत्री आणि उदयोगमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? याची कागदपत्रे आज महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती. ती कागदपत्रे मिळाली नाहीत, असे सामंत म्हणाले. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 15 जुलै 2022 पासून एका महिन्यात वेदांतासाठी सहा बैठका झाल्या होत्या. वेदांता आणण्यासाठी 38 हजार कोटींची पॅकेज द्यायचं होतं. त्यासाठी हायपॉवरची मागील सहा महिन्यात कोणतीही बैठक झाली नव्हती. याचे एमआयडीसीकडून आलेले पुरावे सामंत यांनी दिले.

अनिल अग्रवाल मुंबईला आलेले असताना देवेंद्र फडणवीस त्यांना भेटले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता, तरी त्यांनी विनंती केली होती. मागच्या अडीच वर्षात जे जे एमओयू झाले पण कारवाई झाले नाही ते 74 प्रकल्प याची लिस्ट माझ्याकडे आहे. पण एमओयू झाल्यानंतर कॅबिनेटची सब कमिटी बैठक होणे आवश्यक होते, ती 14 महिने झालीच नाही, असे सामंत म्हणाले. मी दोनच मुद्दे सांगत आहे, हाय पॉवर कमिटीची बैठक का नाही झाली? सब कमिटीची बैठक का नाही झाली? याची उत्तर विरोधकांनी द्यावीत. 

बिडीपी चा प्रकल्प कुठेही गेला नाही, तो रायगड मध्येच होणार आहे. मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प गेला असे देखील म्हटले गेले, ओरिकला किती जण गेले माहीत नाही, पण ही सिटी समृद्धी महामार्गापासून फक्त नऊशे मीटरवर आहे, तो रस्ता बनवणे अशी मागणी केली होती ती पूर्ण झाली नाही. मी तिकडे गेलो आणि त्यांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आणि तो रस्ता मंजूर करुन घेतला. 

रिफायनरी बाबत देखील आज माजी उद्योग मंत्री म्हणाले की आम्ही तो प्रकल्प आणला, ते बरे झाले, आता तिथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना एकदा विचार की तो प्रकल्प त्यांना मान्य आहे का? तर त्यांचा खूप या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. उध्दव ठाकरे यांचा नाणार रिफायनरीला विरोध होत त्यामुळे एका दिवसात नोटिफाय केले गेले, जो प्रकल्प 3 लाख कोटींचा होता तो 1 लाख 40 हजार कोटींचा झाला. आता तो कमी का झाल? हे पण त्यांना विचारायला हवं, असे सामंत म्हणाले. 

मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलो. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर टीका करायला हवी होती, त्यावेळी म्हटले नाही खोके घेऊन गेले, पण त्यांनी काही टीका केली नाही. कधी मला गद्दार म्हणाले नाही, मी इतिहासात पहिल्यांदा रत्नागिरी येथून शिवसेनेचा आमदार निवडून आलेला चालतो, असे सामंत म्हणाले. युवासेना सचिवांनी ट्विट करून आम्हाला प्रश्न विचारू नये. आदित्य ठाकरे वरळीत असून शेताच्या बांधावर का जातात? हा त्यांचा प्रश्न अहे. त्यामुळे मी कोणाविषयी बोलावे हा माझा प्रश्न आहे, युवा सेना सचिवांनी आधी ग्रामपंचायत लढवून दाखवावी त्यानंतर आरोप करावे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget