एक्स्प्लोर
भाजप नेते जयकुमार रावल नाराय़ण राणेंच्या भेटीला

सिंधुदुर्ग : राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काँग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रावल यांनी सिंधुदुर्गमधील पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. नुकतंच नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर माध्यमांसमोर बोलताना काँग्रेसचे नेतेच अशाप्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप राणेंनी केला होता. तसंच पक्षबदलाच्या शक्यतांनाही पूर्णविराम दिला होता. राणेंचं स्पष्टीकरण "मी भाजपात जाण्याची कोणतीही शक्यता नाही. जयकुमार रावळ नेहमीच माझ्या घरी येत असतात," असं नारायण राणेंनी रावल यांच्या भेटीनंतर स्पष्ट केलं. विरोधकांनी सुरु केलेल्या संघर्षयात्रेत 4 एप्रिल रोजी पनवेलमध्ये सहभागी होणार असल्याचही राणे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या :
आणखी वाचा























