'आर्थिक संकट मोठं, दुष्परिणाम पुढील वर्ष दीड वर्ष दिसणार' : जयंत पाटील
कोरोना काळात उद्योग बंद झाले आहेत. काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहात आहोत. आर्थिक संकट मोठं आहे, पुढेही याचे दुष्परिणाम वर्ष दीड वर्ष दिसणार आहे ,त्यातून मार्ग काढावा लागेल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबई : कोरोना काळात उद्योग बंद झाले आहेत. लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याच्यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहात आहोत. आर्थिक संकट मोठं आहे, पुढेही याचे दुष्परिणाम वर्ष दीड वर्ष दिसणार आहे ,त्यातून मार्ग काढावा लागेल, असं राज्याचे जलसंपदा जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यात आता बरेच उद्योग सुरू झाले. पुढच्या काही काळात जनजीवन सुरळीत होऊ शकेल. सरकार वेळोवेळी विचार करून पावलं टाकत आहे. आर्थिक संकट मोठं आहे, पुढेही याचे दुष्परिणाम वर्ष दीड वर्ष दिसणार आहे ,त्यातून मार्ग काढावं लागेल. व्यवहार सगळे सुरळीत होतील तेव्हा उत्पन्न वाढेल. आता हे लगेच होणार नाही, असं पाटील म्हणाले.
महाराष्ट्र आर्थिक संकटात, बेरोजगारी दर वाढला
पाटील म्हणाले की, जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा झाली आहे. भारतात 3 लाख कोटींचे शॉर्टेज आहे. 1 लाख 10 हजार कोटी नॉन कोरोनामुळे नुकसान झाले आहे तर कोविडमुळे 1 लक्ष 90 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याची भरपाई कशी करायची याची चर्चा सुरु आहे.
ते म्हणाले की, नॉन कोविड संकटामुळे केंद्र राज्याला कर्ज काढायला देणार ते कर्ज मुद्दल आणि व्याज केंद्र सरकार भरणार आहे. महाराष्ट्र कर्ज काढणार आहे. इतर राज्यांना कर्ज काढणे गरजेचं आहे. मात्र राज्यांच्या हातात काही अधिकार नाही, असं ते म्हणाले.
अजित पवार यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट
राज्य सहकारी बँकेच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले की, ही बँक कर्ज देते, वसुली करते. राज्य सहकारी बँक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले. षडयंत्र केले. आज त्यात तथ्य नाही हे सिद्ध झालं. शरद पवार यांना देखील यात खेचण्याचं काम झालं. भुई धोपटण्याचे काम केलं. आता सर्व संचालकांना क्लिनचिट दिली. आम्ही आधीपासून सांगत होतो भाजपने गैरफायदा घेतला,आरोप केले, असं पाटील म्हणाले.