दूध संघाच्या निवडणुकीत अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडून, कोणी काही म्हणो...विजय आमचाच; मंत्री गुलाबराव पाटलांचा विश्वास
Jalgaon District Milk Union Elections : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत विजय आमचाच होणार आहे, अशा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय.
Jalgaon News Update : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडून आहे. त्यामुळे कोणी काही म्हणो, विजय आमचाच होईल, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आज अर्ज परत घेण्याचा अंतिम दिवस होता. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पड. ली या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे संजय पवार या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाकडून आहेत. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "संजय पवार हे अजित पवार यांच्या फोनवरून चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला गेले होते. त्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा परत आले आहेत. त्यांनी आम्हाला शब्द दिला असल्याने गद्दारी करू शकत नाहीत, असे त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे. संजय पवार हे एकटेच नाही तर पाचोराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे सुद्धा आम्हाला येऊन मिळाल्याले असून अर्धी राष्ट्रवादी आमच्याकडून आहे, कोणी काही म्हणो, विजय आमचाच आहे, असे पाटील म्हणाले.
"ही निवडणूक सर्वपक्षीय करून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. आता निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे, असा विश्नास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय.
दोन-दोन मंत्री आणि पाच आमदार मला पाडण्यासाठी एकत्र आले आहेत असे एकनाथ खडसे म्हणाले होते. यालाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युतर दिलय. "एकनाथ खडसे यांनी त्यांच्या काळात तेच केलं होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. खडसे मंत्री असताना त्यांनी दोन ते तीन वेळा जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवली. मात्र मी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहे. तसेच आम्ही उपरे नाहीत, कुणाला पहायचं असेल त्यांनी येवून जावं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावलाय.
दरम्यान, राज्यपाल पदमुक्त होणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "राज्यपाल पदमुक्ती होत आहेत ते मला माहित नाही. पण राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावे. त्यांना हात जोडून माझी विनंती आहे.
महत्वाच्या बातम्या