ताफा थांबवत मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
मंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. येवला विंचूर रस्त्यावर धुळगाव फाटा येथे एका कारचा अपघात झाला होता. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याठिकाणी थांबत भुजबळ अपघातग्रस्तांना मदत केली.
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असताना दौरा आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निफाडकडे जात होते. यावेळी येवला विंचूर रस्त्यावर धुळगाव फाटा येथे नुकताच एका कारचा अपघात झाला होता. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याठिकाणी थांबत अपघातग्रस्तांना मदत केली.
अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर त्यांनी तातडीने येवला येथील डॉक्टरांना फोनवरून संपर्क करत अपघातग्रस्तांना दाखल करून उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच यासाठी आपल्या कार्यालयातील लोकांना अपघात ग्रस्त ठिकाणी थांबवून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या.
येवला- नाशिक या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती चालू आहे. ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे चालू असतील अश्या ठिकाणी ठळक अक्षरात वाहनांना योग्य दिशा दर्शविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले. त्याचप्रमाणे गरज असल्यास वाहतूक विभागाची मदत घेऊन वाहतूक वळविण्यात यावी असे आदेश देखील मंत्री भुजबळ यांनी दिले.
क्रूझ पार्टीवर भुजबळांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर भुजबळ यांनी दिले उत्तर
येवला येथे कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ आले असता यावेळी क्रूझ पार्टीला राज्य सरकारने परवानगी का दिली असे पत्रकारांनी विचारले असता. भुजबळ म्हणाले की या पार्टीला कोणी परवानगी दिली हे मला काय माहित नाही. मात्र हॉटेलला परवानगी देणे, लॉन्सला परवानगी राज्य सरकार देतं म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही राज्य सरकार सांगत नाही म्हणजे सरकार यात कस काय दोषी असतं, असे भुजबळ म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असा आरोप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे, याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, केंद्राचे नाव न घेता हे सर्व ऑर्डरच सोडत असतात. याला जेलमध्ये, त्याला जेलमध्ये, त्या मंत्र्याला जेलमध्ये मग हे सांगितल्यावर कुठली ना कुठली यंत्रणा कामाला लागते. त्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करा ना, अशी टीका भुजबळांनी केंद्राचं नाव न घेता केली.
गोपीचंद पडाळकरांनी झेड प्लस सुरक्षेचा गृहमंत्री कुठे सापडेना असा घणाघात केला आहे यावर भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की माजी पोलीस कमिशनर पण गायब आहेत. त्यांना पण सुरक्षा असते तक्रारदारच मुळात गायब आहेत असे भुजबळ म्हणाले.