Bridge collapses in Gujarat Video: गुजरातमध्ये पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; 9 जणांचा अंत, 8 जणांना वाचवलं, मध्य गुजरातचा सौराष्ट्राशी संपर्क तुटला
Bridge collapses in Gujarat Video: आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.

Bridge collapses in Gujarat Video: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा नदीत पडली. तुटलेल्या टोकावर एक टँकर अडकला. अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन पथके पाठवण्यात आली आहेत. 45 वर्षे जुना हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडतो. पूल कोसळल्यामुळे दक्षिण गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, तापी आणि वलसाड यासारख्या शहरांमधून सौराष्ट्रला पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागेल. आता यासाठी अहमदाबादमार्गे लांब मार्गाने जावे लागेल.
⭕DRONE SHOT / INFO
— Vijaykumar Desai (@KumarVijayDesai) July 9, 2025
Gujarat | The Gambhira bridge on the Mahisagar river, connecting #Vadodara and #Anand, collapses in #Padra. 3 people died and 5 people were rescued.
Several representations were made regarding the repair of the bridge. The negligence of the government and… pic.twitter.com/d43TQHfnKU
बचावकार्यात प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही
अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. एका स्थानिक तरुणाने सांगितले की, "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही." स्थानिकांनी सांगितले की, पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. 6 जणांना वडोदरा येथील पद्रा रुग्णालयात आणि 2 जणांना सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली. त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
In Gujarat’s Vadodara, the Gambhira Bridge connecting Anand and Vadodara collapsed.
— Mohammed Zubair (@zoo_bear) July 9, 2025
Several vehicles, including a truck, a tanker, and cars, plunged into the rive. Rescue and relief operations are currently underway. pic.twitter.com/0FFJ4GPZua
मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांच्या पथकाला चौकशीचे आदेश दिले
लोकांनी सांगितले की, 45 वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेकवेळा कळविण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांच्या पथकाला चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा जुन्या आणि कमकुवत पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर वेळेत वाहनांची वाहतूक थांबवली असती आणि नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले असते, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती. आता तपास अहवालात काय बाहेर येते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या


















