एक्स्प्लोर

दुधाला 34 रुपये दर देण्याच्या विखे पाटलांच्या घोषणेचं काय झालं? दुध उत्पादकांना दिलासा द्या, अन्यथा पुन्हा एल्गार, किसान सभा आक्रमक 

सरकारनं तातडीनं याची दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय.

Kisana sabha on Milk Price : सध्या राज्यातील दुध  (Milk)उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण दुधाच्या दरात (Milk Price) सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याविरोधात विविध शेतकरी संघटनांसह किसान सभा (Kisan sabha) आक्रमक होताना दिसत आहे. कारण सध्या दुधाला 25 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं सरकारनं तातडीनं याची दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय.

दुधाला किमान 34 रुपये दर अशी घोषणा दुग्ध विकासमंत्री विखे पाटलांनी केली होती

दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दुध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. दुध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान 34 रुपये दर दिला जाईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र आज दुधाला केवळ 25 रुपये दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले. आंदोलनामुळं  सुरु करण्यात आलेले दुध अनुदानही सरकारने बंद केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळं मोठा असंतोष खदखदत आहे. राज्य सरकारने या असंतोषाची तातडीने दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल असा इशारा किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने  दिला आहे. 

 प्रतिलिटर किमान 10 रुपये अनुदान द्यावे

दुध उत्पादकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर  5 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, हे अनुदान केवळ 6 आठवडे म्हणजेच केवळ 2 महिने दिले गेले. दुधाला आज मिळणारा दर पहाता हे अनुदान पुन्हा सुरु करावे, दुध उत्पादकांचा वाढता तोटा व वाढता उत्पादनखर्च पाहता अनुदानामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम प्रतिलिटर किमान 10 रुपये करावी. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी ते 10 मार्च या काळात केवळ अनुदान दिले गेले. पुढील चार महिने अनुदान बंद आहे. बंद काळातील अनुदानासह थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावे, अशी मागणी किसान सभा वआणि दुध उत्पादक  शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

पशुखाद्याच्या दरात वाढ, चाऱ्याची टंचाई

राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची राज्यात तीव्र टंचाई आहे. औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादनखर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकार व राज्याचे दुग्धविकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर येताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर अखेर दुध उत्पादकांना  तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही असे अजित नवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

दूध उत्पादकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, 7 दिवसात दर वाढवा अन्यथा..सुळेंचा सरकारला इशारा

 

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Embed widget