एक्स्प्लोर
राज्यभरात दूधकोंडी : कुठे काय घडलं?
स्वाभिमानीच्या दूध दरासाठीच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यभरात दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत.
मुंबई : दूधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. शहरांना होणाऱ्या दुधाचा पुरवठा बंद करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
'स्वाभिमानी'च्या दूध दरासाठीच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यभरात दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत.
कुठे काय घडलं?
बारामती
बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये आंदोलक दूध उत्पादकांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
पुणे
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राष्ट्रवादीने दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं. य़ावेळी भाजप सरकारविरोधी घोषणाबाजी आणि पुंगी बजाओ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
अहमदनगर
अहमदनगर-सोलापूर मार्गावर दूध दरवाढीसाठी दूध उत्पादकांनी जोरदार निदर्शने केली. शिराढोन गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी सरकारी दूध धोरणाचा निषेध करत दूधाला दरवाढ देण्याची मागणी केली.
जुन्नर
एकीकडे आंदोलक दूध वाया घालवत असताना पुण्यातील जुन्नर तालुक्यात मात्र अनोखं आंदोलन केलं गेलं. आंदोलकांनी दूध विक्रीला न पाठवता, गरिबांमध्ये वाटलं.
परभणी
परभणीमध्येही आंदोलकांनी दूध वाया न घालवता गरिबांना दान केलं. परभणीच्या रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. लवकर निर्णय झाला नाही, तर जिल्ह्याबाहेर दूधाचा एकही टँकर जाऊ देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
कसारा
स्वाभिमानीच्या आंदोलनात काही आंदोलकांनी गनिमी काव्याचाही वापर केला. मुंबईच्या दिशेने दूध घेऊन निघालेल्या टँकरना नाशिक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी कसाऱ्यात अडवलं. त्या टँकरची हवा सोडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि महामार्ग मोकळा केला.
वाशिम
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये दूध आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी राजहंस कंपनीच्या टँकरला अडवलं आणि त्याला आग लावली. दरम्यान त्याआधीच ड्रायव्हरने गाडीतून उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला.
नागपूर
नागपूरच्या मौदा तालुक्यातल्या तारसा गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खाजगी डेअरीचे टेम्पो अडवले. तसंच शहराकडे जाणारं दूध रोखलं. त्यानंतर शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालून सरकारला सुबुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली.
संबंधित बातम्या:
दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा
राज्यभरात दूधकोंडी : कुठे काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement